Congress: 'लोकांना काँग्रेसला मतदान करायचे पण...; दिग्विजय सिंह यांचा काँग्रेसला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:37 PM2023-04-20T13:37:58+5:302023-04-20T13:39:24+5:30
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
मध्य प्रदेश मध्ये काही महिन्यातच विधानसभा निवडणुकी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाच्या हायकमांडवर टीका केली आहे. काँग्रेसचे संघटन कमकुवत असल्याचे दिग्विजय सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. 'मतदानाच्या दिवशीही काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन कमकुवत असते, असंही सिंह म्हणाले.
Rahul Gandhi : राहुल गांधींना मोठा धक्का, सूरत न्यायालयाने याचिका फेटाळली
दिग्विजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या हायकमांडवर टीका केली. सिंह म्हणाले की, आमचा काँग्रेस पक्ष जसा असावा तसा संघटित नाही हे मान्य करायला आमची हरकत नाही. आपल्या मतदानाच्या दिवशी आपल्या मतदान व्यवस्थापनात फार मोठी कमतरता आहे हे मान्य करायला हरकत नसावी. ज्या प्रकारची तयारी करायला हवी, तशी तयारी केली जात नाही, असंही दिग्विजय सिंह म्हणाले.
काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापनातील त्रुटी सांगून दिग्विजय म्हणाले की, लोकांना आम्हाला मतदान करायचे आहे, पण आमच्या संघटनेच्या कमकुवतपणामुळे ते ते करू शकत नाहीत.
मध्य प्रदेशमध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिग्विजय सिंह २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या जागांवर पक्षाचा पराभव झाला त्या जागांवर सतत भेटी देत आहेत. आणि या जागांवर पक्षाचा दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसने ६६ जागांची यादी तयार केली आहे. या संदर्भात दिग्विजय सिंह मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात गेले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे कौतुक करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, त्यांनी संपूर्ण राज्यातील विधानसभेच्या जागा सेक्टर आणि मंडलांमध्ये विभागल्या आहेत. एका मंडळात १० ते १५ मतदान केंद्रे असतील, तर एका सेक्टरमध्ये ३ ते ५ मतदान केंद्रे असतील. दिग्विजय सिंह म्हणाले की, राज्यभरातील अशा विधानसभा मतदारसंघांच्या गमावलेल्या जागांना भेटी देऊन अहवाल तयार करून कमलनाथ यांच्याकडे सोपविला जाईल. यानंतर नवीन रणनीती आखली जाईल.