भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये कोण जिंकणार? समोर आला धक्कादायक सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 09:24 AM2023-09-30T09:24:18+5:302023-09-30T09:24:47+5:30

Assembly Election survey : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील संभाव्य निकालांबाबत एक ओपिनियन पोल समोर आला असून, त्यामधून दोन्ही राज्यात आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारेल याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

Direct fight between BJP and Congress, who will win in Madhya Pradesh, Rajasthan? A shocking survey came out | भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये कोण जिंकणार? समोर आला धक्कादायक सर्व्हे

भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये कोण जिंकणार? समोर आला धक्कादायक सर्व्हे

googlenewsNext

लोकसभा निव़डणुकीपूर्वी देशातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांच्या दरम्यान होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष थेट आमने-सामने येणार असल्याने या दोन राज्यांत काय निकाल लागेल याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील संभाव्य निकालांबाबत एक ओपिनियन पोल समोर आला असून, त्यामधून दोन्ही राज्यात आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारेल याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

टाइम्स नाऊ-नवभारत आणि इटीजीने प्रसिद्ध केलेल्या या सर्व्हेनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येथे शिवराज सिंह चौहान यांचं नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री आणि खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतरही विधानसभेची निवडणूक भाजपाला जड जाण्याची शक्यत आहे. तर काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये बहुमतासह बाजी मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या सर्व्हेतील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमध्ये आज निवडणूक झाल्यास भाजपाला ४२.८ टक्के मतं मिळू शकतात. तर काँग्रेसला ४३.८ टक्के मतं मिळू शकतात. इतर पक्षांच्या खात्यामध्ये १३.४० टक्के मतं जाण्याची शक्यता आहे. या मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर केल्यास राज्य विधानसभेच्या २२९ जागांपैकी भाजपाला १०२ ते ११० तर काँग्रेसला ११८ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांच्या खात्यामध्ये २ जागा जाऊ शकतात. 

तर राजस्थानमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये भाजपा आणि काँग्रेसला प्रत्येकी ४२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांमध्ये ०.६० टक्क्यांचं अंतर राहण्याची शक्यता आहे. इतर पक्ष आणि अपक्षांना १५ टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण २०० जागांपैकी भाजपाला ९५ ते १०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ९१ ते १०१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या खात्यात ३ ते ६ जागा जाऊ शकतात.   

Web Title: Direct fight between BJP and Congress, who will win in Madhya Pradesh, Rajasthan? A shocking survey came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.