राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:25 PM2024-12-04T12:25:38+5:302024-12-04T12:28:07+5:30
Rahul Gandhi News: राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावरून इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रामगोपाल यादव यांनी टीका केली आहे.
संभल येथील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांना गाझीपूर बॉर्डर येथे अडवण्यात आले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावरून इंडिया आघाडीतीलकाँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रामगोपाल यादव यांनी टीका केली आहे.
रामगोपाल यादव म्हणाले की, काँग्रेस पक्ष संसदेत संभलमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत नाही. मात्र राहुल गांधी संभलच्या दौऱ्यावर जात आहेत. आता याला काय म्हणावं. काँग्रेस केवळ औपचारिकता निभावत आहे. पोलीस त्यांना तिथे जाऊ देणार नाहीत.
#WATCH | On Lok Sabha LoP Rahul Gandhi's visit to Sambhal, SP MP Ram Gopal Yadav says, "Our party was already going there and they too were not allowed. They (Rahul Gandhi and other Congress leaders) are going only now..." pic.twitter.com/bnwSMEx3x8
— ANI (@ANI) December 4, 2024
दरम्यान, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना संभलमध्ये जाऊ न देण्याच्या स्थानिक प्रशासनाच्या निर्णयावर टीका केली आहे. हा निर्णय म्हणजे हुकूमशाही आहे. आमच्या नेत्यांना रोखलं जात आहे. आम्ही शांततापूर्वक मार्गाने संभलला जात होतो. मात्र आम्हाला रोखण्यात येत आहे. संभलमध्ये दंगल झाली म्हणून आम्ही तिथे जात आहोत. तिथे जाणं हा आमचा अधिकार आहे, असे जयराम रमेश म्हणाले.