'गामोछा' माहीत आहे? हे 'अनाप-शनाब' आपल्याला कोण शिकवतं? CM हिमंता राहुल गांधींवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:15 PM2024-01-25T12:15:36+5:302024-01-25T12:21:10+5:30
आसाममध्ये 'भारत जोडो न्याय यात्रा' घेऊन पोहोचलेल्या राहुल गांधी यांनी व्यासपीठावरून याच गमछ अथवा गोमोछा संदर्भात असे काही भाष्य केले आहे की, सीएम हिमंता बिस्वा सरमा संतप्त झाले आहे आणि त्यांनी व्हिडिओचा तो भाग ट्विट करत राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे.
गमछाचा वापर संपूर्ण भारतभरात केला जात असला तरी, त्याची नावे वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळी आहे. याला कुठे गमछा म्हटले जाते, कुठे गामोछा म्हटले जाते, कुठे अंगवस्त्रम् तर कुठे अंगोछा देखील म्हटले जाते. आता, आसाममध्ये 'भारत जोडो न्याय यात्रा' घेऊन पोहोचलेल्या राहुल गांधी यांनी व्यासपीठावरून याच गमछ अथवा गोमोछा संदर्भात असे काही भाष्य केले आहे की, सीएम हिमंता बिस्वा सरमा संतप्त झाले आहे आणि त्यांनी व्हिडिओचा तो भाग ट्विट करत राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे, आज हे दोन्ही नेते एकमेकांना निशाणा बनवण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.
काय म्हणाले होते राहुल गांधी? -
संबंधित व्हिडिओमध्ये राहुल गांधी 'म गमछा म्हणालो. यावर मला कुणी सांगितले की, आम्ही आसाममध्ये याला गामोछा नाही गामोछा म्हणतो. मी विचारले याचा काय अर्थ होतो? त्यांनी सांगितले, 'गा' म्हणजे शरीर आणि मोछा म्हणजे पुसण्याचे. म्हणजे, याच्या सहाय्याने आपण आपले शरीर स्वच्छ करतो.
राहुल बाबा, असम का गामोछा सिर्फ शरीर पोछने के लिए नहीं है। यह असम के स्वाभिमान का प्रतीक हैं। गामोछा कई प्रकार के होते है। असम के सबसे बड़े उत्सव बिहु में गामोछा बिहुआन के तौर पर, अतिथि के सम्मान के लिए, भगवान के आसन के लिये और उत्सव एवं अन्य समारोह पर पहनने के लिए प्रयोग किया… pic.twitter.com/BvE84pXhj3
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) January 24, 2024
हे 'अनाप-शनाब' आपल्याला कोण शिकवते? -
यावर आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी एक्सवर म्हटले आहे की, 'राहुल बाबा, आसामचा गामोछा केवळ शरीर पुसण्यासाठी नाही. हे आसामच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे. गामोछे अनेक प्रकारचे असतात, आसाममधील सर्वात मोठा उत्सव बिहूमध्ये गामछा बिहुआना म्हणून, पाहुण्यांच्या सन्मानार्थ, परमेश्वराचे आसन म्हणून आणि सण अथवा समारंभात वापरण्यासाठी होतो. हे 'अनाप-शनाब' आपल्याला कोण शिकवते? की आपण जाणून बुजून काहीही बोलता?'