‘कुठल्या बोगस माणसाला PM बनवू नका, तुम्हीच पंतप्रधान व्हा’, राहुल गांधींना सल्ला   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 10:23 PM2023-01-19T22:23:18+5:302023-01-19T22:24:13+5:30

Bharat Jodo Yatra: पंजाबमध्ये काँग्रेस आमदारांच्या गटाचे नेते प्रताप सिंह बाजवा यांनी आज पक्षाचे नेते राहुल गांधी यांना अजब सल्ला दिला आहे. पुढच्या वर्षी कुठल्या बोगस व्यक्तीला पंतप्रधान बनवू नका. तर स्वत:च पंतप्रधान व्हा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

'Don't make some bogus PM, be the PM yourself', advice to Rahul Gandhi | ‘कुठल्या बोगस माणसाला PM बनवू नका, तुम्हीच पंतप्रधान व्हा’, राहुल गांधींना सल्ला   

‘कुठल्या बोगस माणसाला PM बनवू नका, तुम्हीच पंतप्रधान व्हा’, राहुल गांधींना सल्ला   

googlenewsNext

पठाणकोट - पंजाबमध्ये काँग्रेस आमदारांच्या गटाचे नेते प्रताप सिंह बाजवा यांनी आज पक्षाचे नेते राहुल गांधी यांना अजब सल्ला दिला आहे. पुढच्या वर्षी कुठल्या बोगस व्यक्तीला पंतप्रधान बनवू नका. तर स्वत:च पंतप्रधान व्हा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. बाजवा राहुल गांधी यांना जेव्हा हा सल्ला देत होते. तेव्हा त्यांच्याबाजूला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेसुद्धा तिथे उपस्थित होते. 

पठाणकोट येथे भारत जोडो यात्रा पोहोचल्यावर एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. तिथे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीमध्ये विधिमंडळ गटाचे नेते प्रतापसिंह बाजवा यांच्यासोबत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर राजा बरार आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनीही राहुल गांधी यांना हा सल्ला दिला.

प्रताप सिंह बाजवा यांनी सांगितले की, एक वचन देऊनच येथून जा. जेव्हा २४ मध्ये पंतप्रधान बनण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्ही स्वत:च बना. याबाबतचा निर्णय आजच ऐकवून जा. नंतर दुसऱ्याला बनवा, म्हणून सांगू नका. मग आमची समजूत घालू नका. पंतप्रधान तुम्हीच बनणार आहात. आम्हाला अन्य कुणी बनावट बनवायचा नाही. आम्ही केवळ तुम्हाला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो.

तर अमरिंदर राजा बरार यांनी सांगितले की, पक्षाने अन्य पक्षांमधून येणाऱ्या संधीसाधू लोकांपासून सावध राहिले पाहिजे. आम्ही जेव्हा जनावर खरेदी करतो तेव्हा संपूर्ण तपास करतो. सुखजिंदरसिंह रंधावा यांनीही पक्षात चुकीच्या लोकांना समाविष्ट न करण्याचा सल्ला दिला आहे. 

Web Title: 'Don't make some bogus PM, be the PM yourself', advice to Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.