Om Birla "आपण महाभारतातला प्रसंग सांगू नका..."! भाजपा खासदाराला उद्देशून नेमकं काय बोलले ओम बिर्ला?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 02:41 PM2024-08-02T14:41:19+5:302024-08-02T14:42:16+5:30

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला  शुक्रवारी कुणाचेही नाव न घेता उपरोधिकपणे म्हणाले, ‘‘आजकाल येथे महाभारतातील किस्सेच अधिकच सांगितले जात आहेत.’’

Don't tell the story of Mahabharata What exactly did Om Birla say to the BJP MP in lok sabha | Om Birla "आपण महाभारतातला प्रसंग सांगू नका..."! भाजपा खासदाराला उद्देशून नेमकं काय बोलले ओम बिर्ला?

Om Birla "आपण महाभारतातला प्रसंग सांगू नका..."! भाजपा खासदाराला उद्देशून नेमकं काय बोलले ओम बिर्ला?

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेश सुरू आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला  शुक्रवारी कुणाचेही नाव न घेता उपरोधिकपणे म्हणाले, ‘‘आजकाल येथे महाभारतातील किस्सेच अधिकच सांगितले जात आहेत.’’ खरे तर, सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रदीप पुरोहित यांनी आयुष मंत्रालयाशी संबंधित प्रश्न विचारताना रामायणातील एका प्रसंगाचा उल्लेख केला. यावरवर बिर्ला म्हणाले, “महाभारत सांगू नका, प्रश्न विचारा. आजकाल येथे महाभारतातील प्रसंग जरा जास्तच सांगितले जात आहेत.’’

तत्पूर्वी, सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना अभिमन्यू प्रसंगाचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी केंद्र सरकारवर भारताला अभिमन्यूप्रमाणे चक्रव्यूहात अडकवण्याचा आरोप केला होता. तसेच, विरोधी I.N.D.I.A. चक्रव्यूह तोडेल, असे म्हटले होते.

संसदेच्या अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पाची तुलना महाभारताच्या चक्रव्यूहशी केली होती. राहुल म्हणाले होते, हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर अभिमन्यूला सहा लोकांनी चक्रव्यूहात अडकवून मारले होते. चक्रव्यूहाचे दुसरे नाव पद्मव्यूह आहे, हे कमळाच्या फुलाच्या आकाराचे असते. त्यात भीती आणि हिंसा आहे.
 
21व्या शतकातही एक नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे. ते देखील कमळाच्या फुलाच्या आकारात तयार झाले आहे. याचा बिल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आप्या छातीवर लावून फिरत असतातत. अभिमन्यूसोबत जे करण्यात आले, तेच भारतीय जनतेसोबत केले जात आहे. आज चक्रव्यूहात 6 लोक आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोभाल, अडाणी आणि अंबानी, असेही राहूल म्हणाले होते.
 

Web Title: Don't tell the story of Mahabharata What exactly did Om Birla say to the BJP MP in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.