...तर काँग्रेसच्या अडचणी वाढणार; निवडणूक चिन्ह गोठवले जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 03:29 AM2020-08-10T03:29:00+5:302020-08-10T06:52:16+5:30

पूर्णवेळ अध्यक्षाच्या निवडीअभावी अपात्रतेचे सावट

EC can freeze Congress symbol or initiate action if party remains leaderless | ...तर काँग्रेसच्या अडचणी वाढणार; निवडणूक चिन्ह गोठवले जाणार?

...तर काँग्रेसच्या अडचणी वाढणार; निवडणूक चिन्ह गोठवले जाणार?

Next

नवी दिल्ली : कायमस्वरूपी अध्यक्ष नियुक्त न करता येणे, काँग्रेसच्या अस्तित्वासाठी धोकायदाक ठरू शकते. राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी अध्यक्षपदाचा राजनीमा दिल्यानंतरही आतापर्यंत काँग्रेसने कायमस्वरूपी अध्यक्ष का नियुक्त केला नाही? काँग्रेसला याबाबत निवडणूक आयोगाला समाधानकारक खुलासा करता आला नाही, तर काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गोठविले जाऊ शकते. अपात्र किंवा निलंबन कारवाईला काँग्रेसला सामोरे जावे जाऊ शकते.

२०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळास सोमवारी एक वर्षे पूर्ण होत आहे. कोविड-१९ च्या साथीमुळे नवीन अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे, असे स्पष्ट करीत काँग्रेसने स्थिती सर्वसामान्य होताच निवडणूक आयोगाच्या नियमाचे पालन करण्याचे आश्वासनही दिले आहे. काही वरिष्ठ नेत्यांचे असे म्हणणे आहे की, संघटनात्मक निवडणुकीतून नवीन अध्यक्षांची निवड केली जावी. तोवर ठराविक अवधीसाठी कमलनाथ किंवा भूपिंदरसिंह हुड्डा यांच्यासारख्या नेत्याला पक्षप्रमुख केले जाऊ शकते.  निवडणुकीत सहभागी होऊन युवा नेत्यांना आपल्या क्षमतेचा अंदाज घेता येईल.

अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप नाही; पण...
निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या अंतर्गत मुद्यांत हस्तेक्षप करीत नाही. तथापि, राजकीय पक्षांनी नियमांचे पालन न केल्यास निवडणूक आयोग संबंधित पक्षाविरुद्ध कारवाई करू शकते.
निवडणूक प्राप्त अधिकारातहत निवडणूक चिन्ह गोठवू शकते. १९८९ मधील लोकप्रतिनिधी अधिनियम कलम २९ (ए), पोटकलम (५) तहत राजकीय पक्षांचे कार्य चालते.
काँग्रेस संघटनेत पद रिक्त झाल्यानंतर ठराविक अवधीत नवीन अध्यक्षांची निवड करण्यासंबंधी विशेष तरतूद आहे का? याबाबत निवडणूक आयोग चौकशी करू शकते. तसेच या ठराविक मुदतीच्या आत पक्षांतर्गत निवडणूक घेण्याचाही आदेश आयोग देऊ शकते.

Web Title: EC can freeze Congress symbol or initiate action if party remains leaderless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.