Election Result 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्री रामासारखे अन् राहुल गांधी पनौती - कंगना रनौत ​

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 08:08 PM2023-12-03T20:08:35+5:302023-12-03T20:09:19+5:30

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर आले.

Election Result 2023 After BJP's victory in the states of Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh, Bollywood actress Kangana Ranaut compared Prime Minister Narendra Modi to Lord Sri Rama and called Congress leader Rahul Gandhi panauti | Election Result 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्री रामासारखे अन् राहुल गांधी पनौती - कंगना रनौत ​

Election Result 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्री रामासारखे अन् राहुल गांधी पनौती - कंगना रनौत ​

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर आले. तेलंगणा वगळता तिन्ही राज्यांमध्ये भाजपाने मोठे यश मिळवत सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या. राजस्थानच्या जनतेने देखील आपली परंपरा कायम राखत सत्ताधारी पक्षाला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचा मोठा विजय दिसून येतो, तर तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तीन राज्यांतील भाजपाच्या विजयाचा आनंद नेतेमंडळींसह कार्यकर्ते करत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो शेअर करत काँग्रेसला लक्ष्य केले. 

कंगनाने मोदींची तुलना प्रभू श्रीरामाशी केली. "प्रभू श्रीराम यांचे आगमन झाले आहे", अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले. यासोबतच अभिनेत्रीने निवडणूक निकालांचा हॅशटॅगही वापरला आहे. कंगनाने मोदींची तुलना श्रीरामाशी केल्यानंतर एका चाहत्याने तिला प्रश्न केला की, हिंदू धर्मात अशी परवानगी आहे का?, ज्याला अभिनेत्रीने प्रत्युत्तर दिले. चाहत्याला उत्तर देताना कंगनाने म्हटले, "होय, परवानगी आहे. श्रीकृष्णाने गीतेत लिहले आहे की, मी तोच आहे जो माझा खरा भक्त आहे, त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. आम्ही खूप प्रेमळ आणि शांतताप्रिय आहोत. तसेच माझ्या वाक्याचा अर्थ असा देखील आहे की मोदीजींनी रामजींना अयोध्येत आणले, त्यामुळे जनतेने त्यांनाच निवडून आणले आहे. पण तुम्ही जे समजत आहात तेही चुकीचे नाही. जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींची उपस्थिती असणारच आहे."

आणखी एक पोस्ट करत कंगनाने सांगितले की, जो सनातन रावणाच्या अहंकाराने मिटला नव्हता, जो सनातन कंसाच्या गर्जनेनेही डगमगला नव्हता, जो सनातन बाबर आणि औरंगजेबच्या अत्याचारानेही मिटला नव्हता, तो सनातन पप्पू पनौतीच्या प्रयत्नाने मिटणार आहे का?, अशा शब्दांत कंगनाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केली. 

Web Title: Election Result 2023 After BJP's victory in the states of Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh, Bollywood actress Kangana Ranaut compared Prime Minister Narendra Modi to Lord Sri Rama and called Congress leader Rahul Gandhi panauti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.