"इंडिया आघाडीचे सरकार बनताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल"; राहुल गांधींची पंजाबमध्ये मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 06:07 PM2024-05-29T18:07:03+5:302024-05-29T18:08:20+5:30

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंजाबमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.

Farmers loans will be waived as soon as India forms a coalition government Rahul Gandhi's big announcement in Punjab | "इंडिया आघाडीचे सरकार बनताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल"; राहुल गांधींची पंजाबमध्ये मोठी घोषणा

"इंडिया आघाडीचे सरकार बनताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल"; राहुल गांधींची पंजाबमध्ये मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंजाबमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी २९ मे रोजी पंजाबमधील लुधियाना येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली. इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच शेतकरी कर्जमाफी आयोगाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली.

तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम

गांधी म्हणाले की, इंडिया आघाडी सरकार स्थापन होताच आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. जसे भाजप अब्जाधीशांचे कर्ज माफ करतात. तसेच शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु. आम्ही एकदाच शेतकऱ्यांची कर्जे माफ करणार नाही, त्यासाठी आम्ही एक आयोग स्थापन करू, ज्याला शेतकरी कर्जमाफी आयोग म्हटले जाईल. ज्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असेल तेव्हा आयोग सरकारला कळवेल आणि आम्ही कर्जमाफी करू, असेही ते म्हणाले.

“एकदा, दोनदा, तीनदा, जितक्या वेळा शेतकऱ्याला गरज असेल तितक्या वेळा आम्ही त्याचे कर्ज माफ करू. शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांचे संरक्षण झाले पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. "पंतप्रधान मोदी म्हणतात की शेतकऱ्यांना कायदेशीर एमएसपी देता येणार नाही. निवडणुकांनंतर इंडिया आघाडी सरकार ४ जून रोजी येईल आणि आम्ही पहिल्यांदाच शेतकऱ्यांना हमीभावासह कायदेशीर एमएसपी देऊ, असंही गांधी म्हणाले. "पंजाबमध्ये ड्रग्जचा मुद्दा वाढत आहे यावर कडक कारवाई करावी, पंजाबने अंमली पदार्थांविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढले पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणाले.

Web Title: Farmers loans will be waived as soon as India forms a coalition government Rahul Gandhi's big announcement in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.