"आधी सर्वाना जात विचारायचे अन् आता...": हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींना विचारला गोंधळात टाकणारा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 09:44 AM2024-08-02T09:44:37+5:302024-08-02T09:46:16+5:30
मुख्यमत्री सरमा म्हणाले, जात न विचारता जातनिहाय जनगणना होईल का? ते (राहुल गांधी) म्हणतात, मी जातनिहाय जनगणना करेन, मात्र स्वतःची जात सांगणार नाही. असे कसे चालेल?
काँग्रेस खासदार तथा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या जातीसंदर्भात लोकसभेपासून सुरू झालेल्या वादात आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही उडी घेतली आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी (2 ऑगस्ट 2024) झारखंडमध्ये या मुद्द्यावर भाष्य केले आहे. "पूर्वी राहुल गांधी पत्रकारांना त्यांची जात विचारत होते. आता जेव्हा लोक त्यांना त्यांच्या जातीबद्दल विचारत आहेत, तेव्हा त्यांना त्रास होत आहे," असे सरमा यांनी म्हटले आहे.
मुख्यमत्री सरमा म्हणाले, जात न विचारता जातनिहाय जनगणना होईल का? ते (राहुल गांधी) म्हणतात, मी जातनिहाय जनगणना करेन, मात्र स्वतःची जात सांगणार नाही. असे कसे चालेल? जर जातनिहाय जनगणना झाली तर राहुल गांधींनाही स्वतःची जात सांगावी लागेल.
#WATCH | Ranchi, Jharkhand: Assam Chief Minister Himanta Biswa Sarma says, "Earlier Rahul Gandhi used to ask journalists about their caste. Now when people ask him about his caste, he has a problem with it. Will the caste census be conducted without asking about caste?... He says… pic.twitter.com/8W3IfmiNuB
— ANI (@ANI) August 2, 2024
लोकसभे सुरू झाली होती चर्चा -
महत्वाचे म्हणजे, राहुल गांधी यांच्या जातीची चर्चा गेल्या तीन दिवसांपूर्वी लोकसभेत सुरू झाली होती. तेव्हा भाजपा खासदार अनुराग ठाकूर म्हणाले होते, "ज्यांना आपली जात माहीत नाही, ते जातनिहाय जनगणनेच्या गप्पा मारत आहेत." त्यांच्या या विदानावरून सभागृहात बराच गदारोळ झाला होता. यावर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही आक्षेप घेत आपण जात कशी विचारू शखता? असा सवाल केला होता. याशिवाय, विरोधकांनीही आक्रमक होत, अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
यानंतर, अनुराग ठाकूर यांनी अखिलेश यादव यांना एक व्हिडिओच्या माध्यमाने प्रत्युत्तर दिले होते. अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर दिखावूपणा आणि सत्य असा उल्लेख करत अखिलेश यादव यांचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमधील एका बाजूला अखिलेश यादव यांनी नुकतेच केलेले विधान दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला ते काही पत्रकारांशी साधलेल्या संवादात जात विचारताना दिसत आहेत.