आजादांपासून सिंधियांपर्यंत..! गेल्या 9 वर्षात अनेक दिग्गजांनी सोडली काँग्रेसची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 03:01 PM2022-08-26T15:01:02+5:302022-08-26T15:01:19+5:30

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार, 2014 ते 2021 दरम्यान शेकडो नेत्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी.

From Gulam Nabi Azad to Sindhiya; In the last 9 years, many veterans have left Congress | आजादांपासून सिंधियांपर्यंत..! गेल्या 9 वर्षात अनेक दिग्गजांनी सोडली काँग्रेसची साथ

आजादांपासून सिंधियांपर्यंत..! गेल्या 9 वर्षात अनेक दिग्गजांनी सोडली काँग्रेसची साथ

googlenewsNext

नवी दिल्ली: काँग्रेसला आज एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मात्र, काँग्रेसला असा धक्का बसण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून आतापर्यंत अनेक दिग्गज आणि बडे नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ​​आहेत.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार, 2014 ते 2021 दरम्यान झालेल्या निवडणुकांमध्ये 222 निवडणूक उमेदवारांनी काँग्रेस पक्ष सोडला, तर 177 खासदार आणि आमदारांनी पक्षाचा निरोप घेतला. याशिवाय 2016 ते 2020 या कालावधीत पक्षांतर केलेल्या सुमारे 45 टक्के आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 पासून काँग्रेस पक्ष सोडलेल्या नेत्यांवर एक नजर टाकूया.

2022 मध्ये काँग्रेस पक्ष सोडलेले नेते

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल, गुजरातचे नेते नरेश रावल आणि राजू परमार, कपिल सिब्बल, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखर, हार्दिक पटेल, माजी कायदामंत्री अश्विनी कुमार, आरपीएन सिंग.

2021 मध्ये पक्ष सोडलेले नेते

गोविंददास कोंथौजामी, विजयन थॉमस, ए नमस्शिवयम, व्हीएम सुधीरन, पीसी चाको, अभिजित मुखर्जी, जितिन प्रसाद, सुष्मिता देव, लुइझिन्हो फालेरो, ललितेश त्रिपाठी, अमरिंदर सिंग, कीर्ती आझाद, मुकुल संगमा, अदिती सिंग, रवी एस नाईक.

2020 मध्ये पक्ष सोडलेले नेते

खुशबू सुंदर, ज्योतिरादित्य सिंधिया.

2019 मध्ये पक्ष सोडलेले नेते

उर्मिला मातोंडकर, मौसम नूर, अल्पेश ठाकूर, कृपाशंकर सिंग, पनाबाका लक्ष्मी, एपी अब्दुल्लाकुट्टी (बहिष्कृत), राधाकृष्ण विखे पाटील, भुवनेश्वर कलिता, संजय सिंग, एसएम कृष्णा, टॉम वडक्कन, नारायण राणे, प्रियंका चतुर्वेदी, चंद्रकांत कांबळे, राधाकृष्ण विखे पाटील.

2018 मध्ये पक्षाचा निरोप घेणारे नेते

अलेक्झांडर लालू हेकी, यंथुंगो पॅटन, अशोक चाधुरी.

2017 मध्ये पक्ष सोडलेले नेते

नारायण दत्त तिवारी, शंकरसिंह वाघेला, यशपाल आर्य, रवी किशन, बरखा शुक्ला सिंग, विश्वजित राणे.

2016 मध्ये पक्ष सोडलेले नेते

रीटा बहुगुणा जोशी, विजय बहुगुणा, एन बिरेन सिंग, अजित जोगी, सुदीप रॉय बर्मन, पेमा खांडू, हरक सिंग रावत.

2015 मध्ये पक्ष सोडलेले नेते

जयंती नटराजन, गिरीधर गमंग, अब्दुल गनी वकील, हिमंता बिस्वा सरमा.

2014 मध्ये पक्ष सोडलेले नेते

दग्गुबती पुरंदेश्वरी, बिरेंदर सिंग, जगदंबिका पाल, जीके वासन, सतपाल महाराज.

Web Title: From Gulam Nabi Azad to Sindhiya; In the last 9 years, many veterans have left Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.