माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 74वी जयंती, दिग्गजांनी वाहिली आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 09:05 AM2018-08-20T09:05:08+5:302018-08-20T10:01:31+5:30
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 74वी जयंती आहे.
नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 74वी जयंती आहे. यानिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी नवी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही यावेळी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अशोक गहलोत हे यावेळी उपस्थित होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टेलिकॉम, आयटी, पंचायत राजसहीत अन्य कित्येक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. 1984 पासून ते 1989 पर्यंत राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे.
(राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडता येणार नाही; केंद्र सरकारची भूमिका)
राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईमध्ये झाला होता आणि 21 मे, 1991 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे 21 मे 1991 रोजी महिला सुसाईड बॉम्बरद्वारे एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांची हत्या केली होती.
Rajiv Gandhi was a kind, gentle and affectionate man whose untimely death left a deep void in my life.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 20, 2018
I remember the times we had together and the many birthdays we were lucky to celebrate with him when he was alive.
He is greatly missed, but his memory lives on. pic.twitter.com/IGwTDJprRd
Delhi: Sonia Gandhi, Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra and Robert Vadra pay tribute to former prime minster Rajiv Gandhi on his birth anniversary. pic.twitter.com/zNIzfmbFwa
— ANI (@ANI) August 20, 2018
Delhi: Former Prime Minister Manmohan Singh and Congress leaders Ghulam Nabi Azad and Ashok Gehlot pay tribute to former prime minster Rajiv Gandhi on his birth anniversary. pic.twitter.com/IhXOhphZFQ
— ANI (@ANI) August 20, 2018
Tributes to our former Prime Minister Shri Rajiv Gandhi Ji on his birth anniversary. We remember his efforts towards the nation.
— Narendra Modi (@narendramodi) August 20, 2018
Remembering and paying my humble tributes to former Prime Minister Bharat Ratna, Sh #RajivGandhi Ji on his birth anniversary. He was a visionary, who paved the way for making a modern India, by ushering in the movement of Information Technology.#RememberingRajivGandhipic.twitter.com/lHhkKq9Hl3
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) August 20, 2018