दिल्लीतील बड्या रुग्णालयात परिचारीकांच्या 'मल्याळम' बोलण्यावर बंदी; राहुल गांधींसह काँग्रेसच्या दिग्गजांचा संताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 10:40 AM2021-06-06T10:40:33+5:302021-06-06T10:41:59+5:30

Delhi Hospital : नर्सिंग स्टाफच्या मल्याळम भाषेत संवाद साधण्याची तक्रार. सर्वाधिक रुग्णांना भाषा समजत नसल्याचं रुग्णालयाचं म्हणणं.

gb pant hospital directed nursing staff to communicate only in hindi english rahul gandhi shashi tharoor opposes | दिल्लीतील बड्या रुग्णालयात परिचारीकांच्या 'मल्याळम' बोलण्यावर बंदी; राहुल गांधींसह काँग्रेसच्या दिग्गजांचा संताप 

दिल्लीतील बड्या रुग्णालयात परिचारीकांच्या 'मल्याळम' बोलण्यावर बंदी; राहुल गांधींसह काँग्रेसच्या दिग्गजांचा संताप 

Next
ठळक मुद्देनर्सिंग स्टाफच्या मल्याळम भाषेत संवाद साधण्याची तक्रार. सर्वाधिक रुग्णांना भाषा समजत नसल्याचं रुग्णालयाचं म्हणणं.

दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयानं नुकतंच एक पत्रक काढलं आहे. यामध्ये रुग्णालयात नर्सिंग स्टाफनं संवादासाठी केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर करण्यास सांगितलं आहे. असं न केल्यास कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचं त्यात नमूद केलं आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णालायल प्रशासनाला एक तक्रार मिळाली होती. यामध्ये नर्सिंग स्टाफ आपल्या राज्यातील भाषेचा वापर करत असल्यानं रुग्णांना समस्या निर्माण होत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर रुग्णालयानं हे पत्रक काढलं होतं. दरम्यान, यानंतर या प्रकरणी काँग्रेसनंदेखील उडी घेतली आहे.

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी या प्रकरणी दखल घेतली आहे. मल्याळम भाषाही तितकीच भारतीय भाषा आहे जितकी कोणती अन्य भाषा. भाषेच्या नावावर भेदभाव बंद केला गेला पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले. जीबी रुग्णालयाला यापूर्वी मिळालेल्या तक्रारीनंतर त्यांनी एक पत्रक काढलं आहे. 'कामाच्या ठिकाणी संवाद साधण्यासाठी मल्याळम भाषेचा वापर केला जात असल्याची तक्रार मिळाली आहे. बहुतांश रुग्णांना आणि अन्य लोकांना या भाषेचं ज्ञान नाही. यामुळे त्यांना समस्या निर्माण होत आहे. यामुळे संवाद साधण्यासाठी भाषेच्या रुपात केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करण्यात यावा. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,' असं यात नमूद करण्यात आलं आहे.
 


जीबी पंत रुग्णालयाच्या नर्सिंग सुप्रिटेंडंड यांनी ५ जून रोजी हे पत्रक जारी केलं आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीदेखील याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. "भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात एक सरकारी संस्था आपल्या परिचारीकांना जे ते भाषा समजू शकतात अशा लोकांशीही त्यांच्या मातृभाषेत बोलू नका असं सांगणं आश्चर्यजनक आहे. हे मानवाधिकाराचं उल्लंघन आहे," असं शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं. तर दुसरीकडे काँह्रेसचे खासदार आणि पक्षाचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल यांनीदेखील यावर आक्षेप घेत केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं आहे. 
 

Web Title: gb pant hospital directed nursing staff to communicate only in hindi english rahul gandhi shashi tharoor opposes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.