राहुल गांधी 'तसं' बोललेच नाही, माझं उत्तर इतर नेत्यांसाठी, सिब्बलांनंतर आझादांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 06:13 PM2020-08-24T18:13:04+5:302020-08-24T18:22:19+5:30
23 नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात लिहिलेल्या पत्रामुळे, सुरुवातीपासूनच बैठकीतील वातावरण तापलेले होते. मात्र, आता वाद वाढत असल्याचे पाहून नेत्यांकडून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नवी दिल्ली -काँग्रेस वर्किंग कमेटीच्या बैठकीत नवी आणि जुनी पिढी पुन्हा एकदा समोरा-समोर आली आहे. 23 नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात लिहिलेल्या पत्रामुळे, सुरुवातीपासूनच बैठकीतील वातावरण तापलेले होते. मात्र, आता वाद वाढत असल्याचे पाहून नेत्यांकडून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथीत वक्तव्यावरून आधी कपिल सिब्बल आणि आता गुलाम नबी आझाद यांनी स्पष्टिकरण दिले आहे.
आझाद यांनी सोमवारी दुपारी ट्विट केले, की ‘काही बातम्या मांध्यमांतून प्रसिद्ध होत आहेत, की काँग्रेस वर्किंग कमेटीच्या बैठकीत मी राहुल गांधी यांना म्हणालो, की त्यांनी माझे भाजपाशी संबंध असल्याचे सिद्ध करावेत. मी स्पष्ट करू इच्छितो, की राहुल गांधी यांनी आमच्या पत्राचा संबंध CWCच्या बैठकीत अथवा बाहेरही भाजपाशी जोडलेला नाही.
आझात यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिले, मी असे म्हणालो होतो, की काँग्रेसचे काही नेते आरोप करत आहेत, की आम्ही भाजपाच्या वतीने, असे पत्र लिहिले आहे. यामुळेच मी म्हणालो होतो, की हे अत्यंत दुर्देवी आहे. काही सहकारी (CWC च्या बेहर) अशा प्रकारचे आरोप करत आहेत, जर त्यांनी हे सिद्ध केले, तर मी राजीनामा देईन.
सुरूवातीला अशी माहिती आली होती, की पत्र लहिलेल्या नेत्यांवर राहुल गांधी बैठकीत भडकले. यानंतर, त्यांनी अशा नेत्यांवर भाजपाला मदत करण्याचा आरोप केला होता. यानंतर गुलाम नबी आझादांची राजीनामा देण्याची गोष्ट समोर आली होती.
गुलाम नबी आझादांपूर्वी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही, राहुल गांधींवर प्रश्न उपस्थित करत, ट्विट केले होते. मात्र, काही वेळांतच त्यांनी हे ट्विट डिलिट केले. यानंतर त्यांनी पुन्हा ट्विट करत लिहिले, की स्वतः राहुल गांधी यांनीच त्यांना सांगितले, की त्यांनी कुठल्याही नेत्यासंदर्भात, असे काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे ट्विट मागे घेतले आहे.
या बैठकीत सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासंदर्भात भाष्य केले. तसेच पक्षाला नवा अध्यक्ष निवडण्यास सांगितले. मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, तसेच एके अँटोनी यांच्यासह अनेक नेत्यांनी सोनिया गांधींनाच पदावर कायम राहण्याचे आवाहन केले आहे.
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमके काय?
देशभरातील काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी 23 नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं 23 नेत्यांनी पत्रात म्हटले आहे.
काँग्रेस नेत्यांनी मांडल्या अडचणी-
१. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये नाहक विलंब.
२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.
३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही.
४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडले.
काँग्रेस नेत्यांच्या मागण्या काय?
१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.
२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणुका व्हाव्यात
३. पक्षानं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची
४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी
५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.
६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.
महत्त्वाच्या बातम्या -
कपिल सिब्बल, आझाद भडकताच 'हे' दिग्गज नेते राहुल गांधींच्या मदतीला; असे केले ट्विट...
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा
CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात
ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!