"तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?"; मुलीने विचारलेल्या बेधडक प्रश्नावर राहुल गांधी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:18 PM2021-02-24T13:18:46+5:302021-02-24T13:25:59+5:30
Congress Rahul Gandhi : राहुल यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. त्यांना अनेकदा सोशल मीडियावर लग्न या विषयावरुन ट्रोल केलं जातं.
नवी दिल्ली - काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आपल्या विधानांमुळे आणि ट्विटमुळे कायम चर्चेत असतात. मात्र आता एका वेगळ्याच कारणामुळे त्यांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. राहुल यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. त्यांना अनेकदा सोशल मीडियावर लग्न या विषयावरुन ट्रोल केलं जातं. राहुल गांधी यांची गर्लफ्रेंड आहे का यासंदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नसून खुद्द राहुल गांधींनीही यासंदर्भात कधी खुलासा केलेला नाही. मात्र आता पुद्दुचेरीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींना थेट गर्लफ्रेंडसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. "तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?" असा प्रश्न एका मुलीने भर कार्यक्रमात विचारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुद्दुचेरीमधील एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांनी शाळेतील मुलांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी हे अगदीच वेगळ्या रुपामध्ये दिसून आलेया कार्यक्रमामध्ये मुलांनी राहुल यांना त्यांच्या खासगी आयुष्यासंदर्भातील अनेक प्रश्न विचारले. याचदरम्यान एका मुलीने राहुल यांना, ‘सर’ असं म्हटलं असता त्यांनी, माझं नाव सर नसून राहुल आहे असं म्हटलं आणि त्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. तुम्ही तुमच्या मुख्याध्यापकांना सर म्हणा. मला हवं तर तुम्ही राहुल अण्णा (मोठा भाऊ) असं म्हणू शकता असं राहुल यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.
"पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना तुमची नजर वेगाने धावणाऱ्या मीटरकडे जाईल, तेव्हा हे लक्षात घ्या की, कच्च्या तेलाचे दर वाढलेले नाहीत, तर उलट कमी झाले आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोलhttps://t.co/dSk0lEKoNy#RahulGandhi#Congress#NarendraModi#ModiGovt#FuelPriceHikepic.twitter.com/ugSsbnCofm
— Lokmat (@MiLOKMAT) February 22, 2021
"माझे अनेक मित्र आहेत. काही राजकारणातील आहेत तर काही बाहेरचे"
राहुल यांना सर म्हणणाऱ्या मुलीने थेट "तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?" असा प्रश्न विचारला. राहुल यांनी या प्रश्नाला हसून उत्तर देताना या प्रश्नाचं उत्तर मी एखाद्या वेगळ्या दिवशी देईन असं म्हटलं. तसेच त्यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं. राजकारण वगळता तुमचे इतरही मित्र आहेत का?, तुम्हाला मैत्रिणी आहेत का?, असतील तर त्या कोणत्या क्षेत्रात काम करतात असा प्रश्नही एका मुलाने राहुल यांना विचारला. त्यावर माझे अनेक मित्र आहेत. काही राजकारणातील आहेत तर काही बाहेरचे आहेत. काहीजण असे आहेत जे मला त्यांचा राजकीय शत्रू मानतात. मात्र मी त्यांना माझा मित्रच मानतो असं उत्तर राहुल यांनी दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Fuel Price Hike : "2021 मध्ये 19 वेळा इंधन दरवाढ", 'ती' आकडेवारी शेअर करत राहुल गांधींचा हल्लाबोलhttps://t.co/JgTRQe13XU#FuelPriceHike#RahulGandhi#Congress#BJP#ModiGovt#PetrolDieselPriceHikepic.twitter.com/M3debEiIFn
— Lokmat (@MiLOKMAT) February 19, 2021
पुडुचेरीत राहुल गांधींनी केलं राजीव गांधींच्या मारेकऱ्यांवर वक्तव्य; म्हणाले, "मी त्यांना माफ..."
एका विद्यार्थीनीने राहुल गांधी यांना त्यांच्या वडिलांच्या हत्येबद्दल प्रश्न विचारला. तसंच याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत? असा सवालही केला. "हिंसाचार तुमच्याकडून काहीही हिसकावून घेऊ शकत नाही. मला कोणाच्याही बाबतीत राग नाही. मी माझ्या वडिलांना गमावलं आणि ती माझ्यासाठी कठिण वेळ होती. आपलं हृदय वेगळं करण्यासारखी ही गोष्ट होती," असं राहुल गांधी उत्तर देताना म्हणाले. "मला खुप दु:ख झालं होतं. परंतु मला राग नाही. माझ्या मनात कोणताही द्वेष नाही. मी त्यांना माफ केलं आहे," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. "हिंसाचारातून काहीही हिसकावून घेतलं जाऊ शकत नाही. माझे वडील अजूनही माझ्यात आहेत. माझे वडील माझ्याद्वारे बोलत आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.
भाजपा नेत्याने लगावला सणसणीत टोलाhttps://t.co/1a1Q98ZBGV#Congress#RahulGandhi#BJP#PuducherryPoliticalCrisispic.twitter.com/anq5AUhikp
— Lokmat (@MiLOKMAT) February 22, 2021