गुजरात निवडणूक : काँग्रेसची मोर्चेबांधणी, काही पक्षांशी आघाडी करण्यास इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 06:00 AM2022-03-31T06:00:30+5:302022-03-31T06:01:08+5:30

ओबीसी, आदिवासी, पाटीदार समुदायांवर लक्ष केंद्रित

Gujarat elections: Congress front formation, willing to lead with some parties | गुजरात निवडणूक : काँग्रेसची मोर्चेबांधणी, काही पक्षांशी आघाडी करण्यास इच्छुक

गुजरात निवडणूक : काँग्रेसची मोर्चेबांधणी, काही पक्षांशी आघाडी करण्यास इच्छुक

Next

शीलेश शर्मा

नवी दिल्ली :  निवडणुकीत गेल्या सात-आठ वर्षांपासून सलग पराभवाला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसनेगुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्याच राज्यात आव्हान देण्यासाठी  अन्य काही पक्षांसोबत आघाडी करण्याची काँग्रेसची योजना आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतीबाबत स्पष्ट बोलण्यास काँग्रेसचे नेते शक्तिसिंह गोहिल हे तयार नव्हते; परंतु प्राप्त संकेतानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अन्य काही पक्षांशी काँग्रेस आघाडी करण्यास इच्छुक आहे. 

पारंपरिक मतदार आम्हाला सोडणार नाहीत
काँग्रेसने या तीन समुदायांना पक्षाकडे वळविण्यासाठी आतापासून काम सुरु केले आहे.  भाजपमध्ये सध्या घबराट आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे वारंवार गुजरातचा दौरा करीत आहे.  गुजरातमधील भाजपचे सरकार आदिवासींना आकर्षित करण्यासाठी बंधू कल्याण योजना राबवत आहे. तथापि, पारंपरिक मतदार भाजपकडे वळणार नाही, असा काँग्रेसचा दावा आहे.

 

Web Title: Gujarat elections: Congress front formation, willing to lead with some parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.