मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार; काँग्रेसचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 03:52 PM2024-09-02T15:52:34+5:302024-09-02T15:53:04+5:30
Haryana Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.
Haryana Assembly Election 2024 : आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. याचाच अर्थ, निवडणुकीपूर्वी पक्षाकडून कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केले जाणार नाही. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर अजय सिंह यादव यांनी ही माहिती दिली.
#WATCH | Delhi: After the Congress CEC meeting, Congress leader Ajay Singh Yadav says, "Winnability should be the criteria for ticket distribution...There is no infighting...Congress will contest the Haryana assembly elections with no CM face. Post elections, the opinion of MLAs… pic.twitter.com/evil132cXp
— ANI (@ANI) September 2, 2024
विशेष म्हणजे, हरियाणापूर्वी गेल्या वर्षी झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता. आता काँग्रेस हरियाणातही तेच करणार आहे. दरम्यान, काँग्रेसने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अशीच भूमिका घेतली आहे. निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री ठरवला जाईल, असे काँग्रेसचे मत आहे.
काँग्रेसचे आश्वासन
रविवारी (1 सप्टेंबर) काँग्रेस नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा यांनी 5 ऑक्टोबरच्या निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यातील सर्व प्रलंबित नोकरभरती पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. ते म्हणाले की, प्रलंबित भरती पूर्ण करण्याबरोबरच पक्ष एक लाख नवीन नोकऱ्या देखील निर्माण करेल.