"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 06:59 PM2024-10-08T18:59:38+5:302024-10-08T19:00:07+5:30

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधी आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांना 'पनौती' म्हटले आहे...

haryana assembly election results 2024 Acharya Pramod Krishnam targets Rahul Gandhi says Panauti | "आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा

"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा

हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. यातच आता, कल्की पीठाधीश्वर तथा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधी आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांना 'पनौती' म्हटले आहे.

कल्कि पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे, "राम मंदिराचे "नाच गाणे" हुड्डाजींना घेऊन बुडाला राहुलजी, आपण तर खरोखरच फार मोठी "पनौती" निघालात." महत्वाचे म्हणजे, हरियाणामध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी, राम मंदिराच्या उद्घाटनावेळी नाच-गाणे सुरू होते, असे म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर सादू-संतांनी आक्षेप घेतला होता. 

भाजप खासदार गिरिराज सिंह यांनीही साधला निशाणा -  
केंद्रीय मंत्री तथा बिहारमधील बेगूसरायचे खासदार गिरिराज सिंह यांनी रुहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. गिरिराज सिंह यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमाने थेट लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधला आहे. "आपण फॅक्ट्रीवाली जिलेबी राहुलजींसाठी आणली आहे. माननीय खर्गेजी यांनी राहुलजींचा पत्ता सांगावा. ती जिलेबी कुठे पाठवू?" अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
 

Web Title: haryana assembly election results 2024 Acharya Pramod Krishnam targets Rahul Gandhi says Panauti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.