हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 02:33 PM2024-10-09T14:33:51+5:302024-10-09T14:34:33+5:30

या निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा 45 पेक्षा तीन जागा अधिक अर्थात 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 36 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच हरयाणामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे. 

haryana assembly elections result 2024 Gohana's jalebi very costly for rahul gandhi congress party in Haryana What did the shopkeeper say? | हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?

हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, राज्यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती जिलेबीची. राजकारणातील तज्ज्ञांपासून ते राज्यातील स्थानिक जनतेपर्यंत सर्वच जण जिलेबीसंदर्भात सोशल मीडिया पोस्ट करताना आणि काँग्रेसची खिल्ली उडवताना दिसत आहेत. यासंदर्भात आता राहुल गांधी यांनी गोहानातील ज्या दुकानाची 'तारीफ' केली होती, त्या दुकानाच्या दुकानदाराचीही प्रतिक्रिया आली आहे. 

राहुल गांधी यांनी गोहानात खाल्ली होती जिलेबी - 
हरयाणा  विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोनीपतच्या गोहानामध्ये एका सभेला संबोधित केले होते. यावेळी, काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी त्यांना गोहानाची जलेबी भरवली होती. यावेळी राहुल गाधी यांनी गोहानातील जिलेबीची दबरदस्त तारीफ केली होती. एवढेच नाही तर राहुल गांधी आपली बहीण प्रियांका गांधींसाठीही येथून जिलेबी घेऊन गेले होते. हरयाणा विधानसभा निवडणुका निकाल समोर आल्यानंतर, जिलेबी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जबरदस्त ट्रेंड करत आहे.

जिलेबी दुकानाचा दुकानदार काय म्हणाला? -
जिलेबी तयार करणाऱ्या दुकानदाराने म्हटले आहे, "राहुल गांधी यांनी जिलेबीचे कौतुक केले होते. ही जिलेबी देशी तुपात करण्यात आली आहे. ती एक आठवड्यांपेक्षाही अदिक दिवस टिकते. जर राहुल गांधी यांनी कौतुक केले असले तर, नक्कीच आयटममध्ये दम असेल. सर्वसामान्य लोकही आमच्या जिलेबीचे कौतुक करतात."

'जिलेबी फॅक्ट्रीतील वस्तू नाही' -
ते पुढे म्हणाले, "ही जिलेबी म्हणजे एखाद्या फॅक्ट्रीतील वस्तू नाही. हा दुकानात बनवला जाणारा पदार्थ आहे. येथे दहा लोक जिलेबी तयार करतात आणि आपली सेवा करतात. आमचे तीन दुकान आहेत. हे दुकान मी जन्माला येण्यापूर्वीचे आहे. मी गेल्या 22-23 वर्षांपासून येथे काम करतो. संपूर्ण माल देशी तुपात तयार केला जातो. येथील जिलेबी भारताबरोबरच परदेशातूनही मागणी आहे.

जनतेनं खिल्ली उडवली -
राहुल गांधी सोनीपतमध्ये एका जाहीर सभेसाठी आले होते. तेव्हा त्यांनी, जिलेबी खाल्ल्यानंतर जिलेबीची फॅक्ट्री लावण्याबरोबरच कामगारांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात भाष्य केले होते. त्यांच्या फॅक्ट्रीसंदर्भातील वक्तव्यावरून भाजप समर्थकांनी त्यांच्यावर निशाणा सधायला सुरुवात केली होते आणि मोठ्या प्रमाणावर मिम्स देखील तयार केले होते. यासंदर्भात स्थानिक लोकही राहुल गांधी यांची जबरदस्त खिल्ली उडवताना दिसत होते. निवडणूक निकालानंतर, हरयाणातील जनतेला विकासाची जिबेली हवी आहे. त्यांना माहीत आहे की, जिलेबी फॅक्ट्रीत नव्हे तर हलवाईच्या दुकानात तयाह होते, असे जनता म्हणत आहे.

या निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा 45 पेक्षा तीन जागा अधिक अर्थात 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 36 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच हरयाणामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे. 
 

Web Title: haryana assembly elections result 2024 Gohana's jalebi very costly for rahul gandhi congress party in Haryana What did the shopkeeper say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.