राफेल विमान करार का बदलून घेतला ? राहुल गांधी यांची मोदींवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:23 AM2017-11-17T00:23:46+5:302017-11-17T00:24:09+5:30
लढाऊ विमान राफेलच्या करारावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी टीका केली.
नवी दिल्ली : लढाऊ विमान राफेलच्या करारावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी टीका केली. तो ‘संपूर्ण करार’ एका व्यावसायिकाच्या फायद्यासाठी बदलून का घेतला, याबद्दल मोदी यांना प्रसारमाध्यमे प्रश्न का विचारत नाहीत, असे ते म्हणाले.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या कंपनीने मोदी सत्तेवर आल्यावर उलाढालीत जी प्रचंड मोठी झेप घेतली त्याबद्दल मोदी यांना का प्रश्न विचारले गेले नाहीत, असे गांधी म्हणाले. तुम्ही जे प्रश्न मला विचारता त्या सगळ्यांची मी उत्तरे देतो. राफेल विमान कराराबद्दल व जय शहा यांच्याबद्दल तुम्ही मोदी यांना प्रश्न का विचारत नाहीत, एका व्यावसायिकाच्या फायद्यासाठी राफेल करार बदलून घेतला गेला याबद्दल तुम्ही मोदी यांना का प्रश्न विचारत नाहीत, असे राहुल गांधी विचारले. ते अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसच्या बैठकीनंतर बोलत
होते.
एआययूडब्ल्यूसीच्या स्थापनेबद्दल गांधी यांनी समाधान व्यक्त करून त्यांच्याशी संवाद साधल्याबद्दल मला बरे वाटत आहे, असे सांगितले.