Hathras Gangrape: प्रियंका अन् राहुल गांधी 'हाथरस'साठी रवाना; पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात
By मुकेश चव्हाण | Published: October 3, 2020 04:08 PM2020-10-03T16:08:33+5:302020-10-03T16:09:10+5:30
आज पुन्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रवाना झाले आहे.
नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी गुरुवारी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र पोलिसांनी दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवण्यात आले होते. याचदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल केली आहे. मात्र आज पुन्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रवाना झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे. यानंतर दोघही हाथरससाठी रवाना झाले असून प्रियंका गांधी स्वत: गाडी चालवत आहे. तर राहुल गांधी त्यांच्या बाजूच्या सीटवर बसल्याचे दिसून आले आहे.
#WATCH Delhi: Congress leader Priyanka Gandhi Vadra on her way to meet the family of the alleged gangrape victim in #Hathras (UP), with Congress leader Rahul Gandhi (Source-Congress) pic.twitter.com/TSy7gLaxPL
— ANI (@ANI) October 3, 2020
Delhi: Congress leader Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra reach Delhi-Noida flyway.
— ANI (@ANI) October 3, 2020
They are en route to #Hathras in Uttar Pradesh to meet the family of the alleged gangrape victim. pic.twitter.com/VLWrj6vCPX
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह 35 खासदारही हाथरसला रवाना होत आहे काँग्रेसचे खासदार बसमधून प्रवास करत आहेत. त्यामुळे नोएडा सीमेवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याबाबत नोएडाचे एडीसीपी रणविजय सिंह म्हणाले, ‘ते कलम 144 चे उल्लंघन करीत आहेत. लोकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही येथे तैनात आहोत, असं त्यांनी सांगितले.
They are violating the Section 144 of CrPC. We are deployed here to control the unlawful assembling of people. We are appealing for peace amid #COVID19 outbreak, in larger public interest they should disperse: Noida ADCP Ranvijay Singh pic.twitter.com/B83u3L8yu8
— ANI UP (@ANINewsUP) October 3, 2020
"योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे"
"योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे. ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्या बंद झाल्या पाहिजेत. गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती होती. तेव्हा आम्ही उन्नावच्या लेकीसाठी अशी लढाई लढत होतो" असं प्रियंका गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.
"त्यांना इतिहास माफ करणार नाही"
"राहुल गांधी हे खासदार आहेत. त्यासोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू व राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. या दोन्ही नेत्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर ज्यांना पडला आहे त्यांना इतिहास माफ करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी देशात विरोधी पक्षाने बोलूच नये अशी भूमिका घेणे ही पूर्णपणे चुकीची आहे. देशातील प्रमुख पक्षाला जर याची जाणीव झाली नसेल तर एक दिवस जनता त्यांची कॉलर धरून खाली पाडेल" असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.