“राहुल गांधी सुनावणीसाठी तयार नाहीत”; दिलासा देणारा निर्णय हायकोर्टाने घेतला मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 02:24 PM2023-05-23T14:24:08+5:302023-05-23T14:28:54+5:30

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

he is not ready for hearing and jharkhand high court vacate its order granting relief to rahul gandhi | “राहुल गांधी सुनावणीसाठी तयार नाहीत”; दिलासा देणारा निर्णय हायकोर्टाने घेतला मागे

“राहुल गांधी सुनावणीसाठी तयार नाहीत”; दिलासा देणारा निर्णय हायकोर्टाने घेतला मागे

googlenewsNext

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मोदी आडनावावरून दाखल असलेल्या मानहानीच्या याचिकेवर दिलासा द्यायला गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर रांचीतील एका न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यातच आता झारखंड उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घेत राहुल गांधी यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. 

झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप राहुल गांधींवर आहे. याप्रकरणी २०२२ मध्ये न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला होता. या प्रकरणावर पुन्हा सुवावणी होणार असून, राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, असे सांगितले जात आहे. 

सुनावणी करण्यास राहुल गांधी तयार नाहीत

न्या. अनिलकुमार चौधरी यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार चाईबासा न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास राहुल गांधी तयार नाहीत, असे न्यायालयाने निरीक्षण केले आहे. सन २०१८ मध्ये चाईबासा येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली होती. एक खुनी व्यक्ती केवळ भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो, काँग्रेसमध्ये नाही, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला होता. 

दरम्यान, राहुल गांधींनी अमित शाह यांच्याविरोधात केलेल्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप नेते नवीन झा यांनी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून मानहानीचा खटला दाखल केला होता. ज्या प्रकारचे आरोप केले जात आहेत ते योग्य नाहीत, असा युक्तिवाद राहुल गांधी यांच्यावतीने करण्यात आला होता. 

 

Web Title: he is not ready for hearing and jharkhand high court vacate its order granting relief to rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.