हनी ट्रॅपप्रकरण : आरएसएसवाले लग्न नाही करत; आतातरी भागवतजी तुम्ही करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 05:52 PM2019-09-27T17:52:50+5:302019-09-27T17:54:39+5:30

या हनी ट्रॅपप्रकरणी काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

Honey Trap Edition: RSS person don't get married; now Mr. Bhagwat you do it! | हनी ट्रॅपप्रकरण : आरएसएसवाले लग्न नाही करत; आतातरी भागवतजी तुम्ही करा!

हनी ट्रॅपप्रकरण : आरएसएसवाले लग्न नाही करत; आतातरी भागवतजी तुम्ही करा!

googlenewsNext
ठळक मुद्देआरएसएसवाल्यांवर ताशेरे ओढत आरएसएसवाले लग्न नाही करत; किमान आता तरी संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी लग्न करावे असा खोचक सल्ला दिला आहे. लवकरच या मोठ्या ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल प्रकरणी नवीन खुलासे येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशात सध्या गाजत असलेल्या हनी ट्रॅपप्रकरणाची व्याप्ती असून या प्रकरणात आतापर्यंत अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्यांची चौकशी झाली आहे. मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप रॅकेटमधील खुलाशाने अनेक नेते, अधिकारी आणि व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे. देशातील सर्वात मोठे ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल असणाऱ्या या प्रकरणाशी संबंधीत ४००० फाईल्स तपास यंत्रणांना मिळाल्या आहेत. आता तर या प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. या हनी ट्रॅपप्रकरणी काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी आरएसएसवाल्यांवर ताशेरे ओढत आरएसएसवाले लग्न नाही करत; किमान आता तरी संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी लग्न करावे असा खोचक सल्ला दिला आहे. 

काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी आज 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या काळात हा सर्व प्रकार सुरु झाला. यामध्ये भाजपचे विशेषत: आरएसएसचे अनेक नेते गुंतले आहेत. यासाठी त्यांचे ब्रह्मचर्य कारणीभूत आहे. त्यामुळेच हे सर्व नेते हनीट्रॅपमध्ये अडकले. किमान आता तरी संघाच्या नेत्यांनी लग्न करायला पाहिजेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही लग्न करावे असे म्हटले आहे. .
पोलिसांच्या विशेष पथकाकडून (एसआयटी) या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामध्ये हा सर्व प्रकार शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असताना सुरु झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सेक्स स्कँडल केवळ मध्य प्रदेशपुरता मर्यादित नसून तब्बल पाच ते सहा राज्यांमध्ये त्याची व्याप्ती असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. या हनी ट्रॅपप्रकरणी पाच आरोपींसोबत अटक करण्यात आलेल्या १८ वर्षीय आरोपी मोनिका यादव हिने सरकारी साक्षीदार बनण्यास तयारी दर्शविली आहे. या प्रकरणात मोनिका यादव मुख्य साक्षीदार असणार आहे. त्यामुळे लवकरच या मोठ्या ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल प्रकरणी नवीन खुलासे येण्याची शक्यता आहे.

Web Title: Honey Trap Edition: RSS person don't get married; now Mr. Bhagwat you do it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.