४९ महिन्यांत काळा पैसा पांढरा कसा झाला - काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 04:32 AM2018-07-01T04:32:40+5:302018-07-01T04:32:52+5:30
नरेंद्र मोदी २0१४ पर्यंत स्विस बँकेत काळा पैसा आहे, सत्तेत आल्यावर आपण तो परत आणू, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, असे सांगत होते.
नवी दिल्ली : स्विस बँकेत २0१७ साली जमा झालेल्या भारतीय पैशावरून काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र चढवले आहे. नरेंद्र मोदी २0१४ पर्यंत स्विस बँकेत काळा पैसा आहे, सत्तेत आल्यावर आपण तो परत आणू, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, असे सांगत होते. आता स्विस बँकेतील भारतीयांचा सारा पैसा काळा नाही, असे सांगत असून, ४९ महिन्यांत काळा पैसा पांढरा कसा झाला, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. २0१४ सालपर्यंत स्विस बँकेत भारतीयांचा असलेला पैसा काळा होता. आता तो पांढरा कसा झाला, हे मोदी यांनी सांगायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले.
२0१७ मध्ये तर ७000 कोटी जमा झाले. आता मात्र तुम्ही हा सारा पैसा काळा नाही, असे सांगता. त्यामुळे पैसा काळ्याचा पांढरा झाला की काय, याचे उत्तरही द्या.
- राहुल गांधी