Rahul Gandhi : "मोदी, शाह, चौहान यांनी आमदार विकत घेतले, मध्य प्रदेशात निवडून आलेलं सरकार चोरलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 02:48 PM2023-11-14T14:48:42+5:302023-11-14T14:56:18+5:30

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदिशा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना मध्य प्रदेशात काँग्रेस किती जागा जिंकेल हे लिखित स्वरूपात देण्यास तयार आहे असं म्हटलं. 

how many seats congress will win in the state rahul gandhi says i can give in written | Rahul Gandhi : "मोदी, शाह, चौहान यांनी आमदार विकत घेतले, मध्य प्रदेशात निवडून आलेलं सरकार चोरलं"

Rahul Gandhi : "मोदी, शाह, चौहान यांनी आमदार विकत घेतले, मध्य प्रदेशात निवडून आलेलं सरकार चोरलं"

मध्य प्रदेशात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पक्षाचा आणि उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदिशा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना मध्य प्रदेशात काँग्रेस किती जागा जिंकेल हे लिखित स्वरूपात देण्यास तयार आहे असं म्हटलं. 

"आम्ही कर्नाटक आणि हिमाचलमध्ये भाजपाला पळून लावलं आहे. मध्य प्रदेशातही भाजपाला प्रेमाने मारून पळवून लावायचं आहे. आम्ही अहिंसेचे सैनिक आहोत आणि कोणाला मारत नाही. मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाचे वादळ येणार आहे. मध्य प्रदेशातील जनता काँग्रेसला 145 ते 150 जागा देणार आहे. तुम्ही लिहून ठेवा. मी मध्य प्रदेशात खूप दौरे केले."

"मध्य प्रदेशात निवडून आलेले सरकार आमदार विकत घेऊन चोरले. काँग्रेस पक्षाचे वादळ येत आहे. पाच वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी सरकारसाठी काँग्रेस पक्षाची निवड केली होती. तुम्ही भाजपा नाही तर काँग्रेस पक्ष निवडला."

"भाजपाचे नेते नरेंद्र मोदी, शिवराजसिंह चौहान आणि अमित शाह यांनी मिळून आमदार विकत घेतले आणि मध्य प्रदेशातील निवडून आलेले सरकार चोरलं. काँग्रेस पक्षाचे आमदार कोट्यवधी रुपये देऊन विकत घेतले, तुमचा निर्णय, तुमच्या हृदयाचा आवाज भाजपा नेत्यांनी आणि पंतप्रधानांनी चिरडून टाकला. तुमची फसवणूक झाली आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: how many seats congress will win in the state rahul gandhi says i can give in written

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.