कधीकाळी 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा किती जागा मिळतील?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 07:07 AM2024-04-13T07:07:19+5:302024-04-13T07:07:45+5:30
मागील दोन निवडणुकांमध्ये साजेशी कामगिरी करता आली नाही.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सर्वत्र प्रचार शिगेला पोहोचलेला दिसत आहे. मागील निवडणुकांतील चुकांचा आढावा घेत त्यावर काम केले जात आहे. देशातील सर्वांत जुना पक्ष असलेला काँग्रेस अनेक वर्ष सत्तेवर राहिला असला, तरी मागील दोन निवडणुकांमध्ये साजेशी कामगिरी करता आली नाही.
मागील निवडणुकांतील काँग्रेसची कामगिरी
वर्ष लढलेल्या विजय दुसऱ्या तिसऱ्या डिपॉझिट
जागा स्थानी स्थानी जप्त
२०१९ ४२२ ५२ २०९ ९९ ०
२०१४ ४६४ ४४ २२४ ६६ १७८
२००९ ४४० २०६ १४४ ४४ ७१
२००४ ४१७ १४५ १७१ ४६ ८२
१९९९ ४५३ ११४ २१६ ६९ ८८
१९९८ ४७७ १४१ १५९ ८८ १५४
१९९६ ५२९ १४० २३४ ५७ १३२
१९९१ ५०० २४४ १६९ ५९ ६३
१९८९ ५१० १९७ २८४ २८ ७
१९८४ ५१८ ४१५ ९६ ६ ५
१९७७ ४९२ १५४ ३३२ ६ १८
१९७१ ४४१ ३५२ ८४ ४ ६
१९६७ ५१६ २८३ २२० ११ १०
१९६२ ४८८ ३६१ ११९ ८ ३
१९५७ ४९० ३७१ ८२ २३ २३
१९५२ ४७९ ३६४ ७३ २३ ३०