परदेशात किती मालमत्ता? यंग इंडियाची स्थापना कुणी केली? ईडीने राहुल गांधींना विचारले असे प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:58 PM2022-06-13T15:58:01+5:302022-06-13T15:58:50+5:30
Rahul Gandhi: नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. आज सकाळी ११.३० वाजता राहुल गांधी ईडीच्या कार्यालयामध्ये हजर झाले त्यानंतर पीएमएलएच्या कलम ५० अन्वये राहुल गांधींचा जबाब नोंदवण्यात आला.
नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. आज सकाळी ११.३० वाजता राहुल गांधी ईडीच्या कार्यालयामध्ये हजर झाले त्यानंतर पीएमएलएच्या कलम ५० अन्वये राहुल गांधींचा जबाब नोंदवण्यात आला. सुमारे साडे तीन तास चाललेल्या चौकशीमध्ये राहुल गांधी यांनी ईडीचे उपसंचालक, सहाय्यक संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारले. सुरुवातीला खासगी प्रश्न विचारल्यानंतर मालमत्ता आणि आर्थिक देवाण-घेवाणीबाबत प्रश्न विचारले आहेत. राहुल गांधी यांना यंग इंडिया आणि आणि असोसिएट्स जर्नल्स लिमिटेडशी संबंधित प्रश्न विचारले.
ईडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींना प्रश्न विचारले आहेत.
- भारतामध्ये तुमची किती संपत्ती आहे आणि कुठे कुठे आहे?
- किती बँकांमध्ये खाते आहे. तसेच त्यामध्ये किती रक्कम जमा आहे?
- परदेशातील कुठल्या बँकेत खाते आहे? त्यामध्ये किती रक्कम जमा आहे.
- परदेशात कुठली संपत्ती आहे, असल्यास कुठे आहे?
- यंग इंडियनशी कसा संबंध आला?
- ईडीने राहुल गांधींना प्रश्न विचारून यंग इंडियन आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या पार्टनरशिपचा पॅटर्न, आर्थिक देवाण-घेवाण आणि प्रवर्तकांची भूमिका समजून घेण्याचा प्रश्न केला.
- राहुल गांधींना यंग इंडियनची स्थापना, नॅशनल हेराल्डच्या संचालन आणि पैशांच्या कथित हस्तांतरणाबाबत प्रश्न विचारले जातात.
- यंग इंडियनच्या प्रवर्तक आणि शेअरधारकांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे काही इतर सदस्यही आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलावल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. दिल्लीपासून ते विविध राज्यांपर्यंत सर्वत्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी तीव्र आंदोलन केले.