...म्हणून घेतला वायनाड येथून लढण्याचा निर्णय, राहुल गांधींनी सांगितले दक्षिण स्वारीचे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 01:56 PM2019-04-04T13:56:45+5:302019-04-04T17:06:57+5:30

उमेदवारी अर्ज भरून रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचे नेमके कारण सांगितले.

I have come to Kerala to send a message that India is one - Rahul Gandhi | ...म्हणून घेतला वायनाड येथून लढण्याचा निर्णय, राहुल गांधींनी सांगितले दक्षिण स्वारीचे कारण 

...म्हणून घेतला वायनाड येथून लढण्याचा निर्णय, राहुल गांधींनी सांगितले दक्षिण स्वारीचे कारण 

Next

वायनाड (केरळ) - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरून रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचे नेमके कारण सांगितले. भारत देश हा एकसंध आहे. हा संदेश देण्यासाठी मी केरळमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असे हे म्हणाले. 

प्रसारमाध्यमांश संवास साधताना राहुल गांधी यांनी सांगितले की, ''भारत देश हा एकसंध देश आहे, हा संदेश देण्यासाठी मी केरळमध्ये आलो आहे. नरेंद्र मोदी आणि आरएसएसकडून येथील भाषा आणि संस्कृतीचा अपमान कण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र दक्षिण भारत केंद्रस्थानी यावा, असा संदेश देण्याचा माझा प्रयत्न आहे. 





दरम्यान, राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून डाव्या पक्षांकडून राहुल गांधींवर जोरदार टीका होत आहे. मात्र राहुल गांधी यांनी डाव्या पक्षांवर टीका करणार नसल्याचे सांगिलते. ''वायनाड येथून लढायचे ठरवल्यापासून डाव्या पक्षातील बंधू-भगिनी माझ्यावर टीका करत आहेत, याची जाणीव मला आहे. मात्र माझ्या संपूर्ण प्रचारादरम्यान मी सीपीएम विरोधात एकही शब्द उच्चारणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.   



 

Web Title: I have come to Kerala to send a message that India is one - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.