...तर तुम्ही राजस्थानचे मुख्यमंत्री होणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 05:53 PM2022-09-22T17:53:35+5:302022-09-22T17:56:57+5:30
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.आता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
नवी दिल्ली :काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.आता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.तर १७ ऑक्टोंबर रोजी निवडणूक होणार आहे. १९ ऑक्टोंबर रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. उमेदवारी संदर्भात आता अशोक गहलोत यांचेही नाव चर्चेत आले आहे. मात्र, राहुल गांधी यांनी एक नेता एक पदचा मुद्दा उपस्थित करत अशोक गहलोत यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
या मुद्द्यामुळे आता राजस्थान काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.पायलट पक्षाच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी केरळमध्ये दाखल झाले आहेत.
शशी थरुर की अशोक गहलोत? 'हे' नेते काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरु शकतात
केरळमध्ये सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदा संदर्भात प्रश्न विचारला. यावेळी पायलट म्हणाले, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कोण लढवणार हे सध्या तरी सांगता येणार नाही. हे २४ सप्टेंबरपर्यंत किंवा त्यानंतरच स्पष्ट होईल.राहुल गांधी हे असे व्यक्ती आहेत की जे कठोर परिश्रम किंवा संघर्षांपासून मागे हटत नाहीत, असं उत्तर पायलट यांनी दिले.