'भाजपाकडे फिल्म फ्रंचाइसी असती तर त्याचं नाव 'लाय हार्ड' असतं', राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 11:25 AM2017-12-23T11:25:33+5:302017-12-23T11:33:00+5:30

ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

'If BJP had a film franchisee, then its name would be' Lie hard ', Rahul Gandhi's target | 'भाजपाकडे फिल्म फ्रंचाइसी असती तर त्याचं नाव 'लाय हार्ड' असतं', राहुल गांधींची टीका

'भाजपाकडे फिल्म फ्रंचाइसी असती तर त्याचं नाव 'लाय हार्ड' असतं', राहुल गांधींची टीका

Next
ठळक मुद्दे ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  जर भाजपाकडे फिल्म फ्रंचाइसी असती तर त्याला 'लाय हार्ड' नाव दिलं असतं, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

अहमदाबाद- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज (ता.23) गुजरातचा दौरा करणार असून राज्यातील पक्षाच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसंच राहुल गांधी ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिरातही जाणार आहेत. गुजरात दौऱ्याच्या आधी राहुल गांधी यांनी ट्विटवर क्रिएटीव्हीटी दाखविली आहे. ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

जर भाजपाकडे फिल्म फ्रंचाइसी असती तर त्याला 'लाय हार्ड' नाव दिलं असतं, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. भाजपावर नेहमीच सडकून टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने भाजपावर टीका केलीये. सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी गुजरात दौऱ्याची सुरूवात सोमनाथ मंदिरापासून करणार आहेत. राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना विविध मंदिरांना भेट दिली होती. त्यामध्ये सोमनाथ मंदिराचाही समावेश होता. 



 

निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांच्या नावाची सोमनाथ मंदिरातील रजिस्टरमध्ये अहिंदू कॉलममध्ये नोंद केल्याने वाद निर्माण झाला होता. नंतर राहुल गांधींच्या नावाची नोंद काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली नसल्याचं पक्षाने स्पष्ट केलं होतं. 
गुजरात विधानसभा निवडणूक निकालात काँग्रेस बहुमताच्या आकड्यांपर्यंत पोहचू शकली नाही. पण काँग्रेसला गेल्या निवडणुकीपेक्षा 16 जागा जास्त मिळाल्या. तर भाजपा लागोपाठ सहावा विजय मिळविण्यात यशस्वी ठरली. पण गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाला कमी जागा मिळाल्या. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 115 उमेदवार निवडणून आले. यावेळी भाजपाला 99 जागांवर समाधान मानावं लागलं. 
 

Web Title: 'If BJP had a film franchisee, then its name would be' Lie hard ', Rahul Gandhi's target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.