"अध्यक्षपदासाठी राहुल गांधी तयार नसतील, तर पर्याय शोधावा लागेल" - शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 10:50 AM2021-09-19T10:50:32+5:302021-09-19T10:51:40+5:30

"काँग्रेसला नवसंजीवनी आणि मजबूत नेतृत्वाची गरज आहे. नव्या नेतृत्वामुळे बदल स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे पक्षालाही बळकटी मिळेल."

If Rahul Gandhi is not ready for the presidency, then we have to find an alternative says Shashi Tharoor | "अध्यक्षपदासाठी राहुल गांधी तयार नसतील, तर पर्याय शोधावा लागेल" - शशी थरूर

"अध्यक्षपदासाठी राहुल गांधी तयार नसतील, तर पर्याय शोधावा लागेल" - शशी थरूर

Next

इडुक्की : काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, ते तयार नसतील तर पर्याय शाेधावा लागेल, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. (If Rahul Gandhi is not ready for the presidency, then we have to find an alternative says Shashi Tharoor)

इडुक्की जिल्ह्यातील थाेडुपुआ येथे आयाेजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बाेलताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले की, साेनिया गांधी यांनी अनेक वर्षे पक्षाचे यशस्वीरीत्या नेतृत्व केले. त्यांनी पक्षाला बळकटी दिली. मात्र, त्यांनी स्वत: अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता नव्या अध्यक्षाची नेमणूक करणे आवश्यक आहे. माझ्यासारख्या जुन्या नेत्यांची ही मागणी लवकरच पूर्ण हाेईल, असा विश्वासही थरुर यांनी व्यक्त केला. 

शशी थरूर यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. मात्र, ते इच्छुक नसतील तर आता आम्हाला पर्याय शाेधावा लागेल. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असून, या प्रक्रियेला आता गती मिळायला हवी, असे थरूर यांनी स्पष्टपणे सांगितले.

नेतृत्वाची गरज
- काँग्रेसला नवसंजीवनी आणि मजबूत नेतृत्वाची गरज आहे. नव्या नेतृत्वामुळे बदल स्पष्टपणे दिसून येतील. त्यामुळे पक्षालाही बळकटी मिळेल, असे शशी थरूर म्हणाले. 
- काँग्रेसमध्ये पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असून, वरपासून खालपर्यंत माेठे बदल करायला हवे, अशा मागणीचे पत्र गेल्या वर्षी साेनिया गांधी यांना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी लिहिले हाेते. त्यात शशी थरूर यांचाही समावेश हाेता. थरूर यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.
 

Web Title: If Rahul Gandhi is not ready for the presidency, then we have to find an alternative says Shashi Tharoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.