“सरकार आलं तर राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापू,” काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 01:32 PM2023-04-08T13:32:48+5:302023-04-08T13:34:29+5:30
राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान केलं वक्तव्य.
Surat Court Judge H H Varma Threatening Case: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात २०१९ च्या मानहानीच्या खटल्याचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापण्याची धमकी तामिळनाडूतील काँग्रेसच्या नेत्यानं दिली आहे. “जर काँग्रेसचं सरकार आलं तर ज्या न्यायाधीशांनी राहुल गांधींना शिक्षा सुनावली त्यांची जीभ कापू,” असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेत्यानं केलंय. राहुल गांधी यांना मोदी आडनावाच्या टीकेवरून २३ मार्च रोजी सुरत न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्याचवेळी, मणिकंदन यांच्या आक्षेपार्ह विधानासाठी आयपीसीच्या कलम १५३बी सह तीन कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मणिकंदन यांच्याविरोधात आयपीसी १५३ बी सह तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
तामिळनाडूतील दिंडीगुल येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अपात्रतेच्या विरोधात काँग्रेसच्या एससी/एसटी शाखेकडून आंदोलन सुरू होतं. “२३ मार्च रोजी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. ऐका, न्यायमूर्ती एच वर्मा, जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा आम्ही तुमची जीभ कापून टाकू.” असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं.
TN Congress leader says that once the party came to power, they would "cut off the tongue" of the judge who gave the verdict against Rahul Gandhi.
— Amit Malviya (@amitmalviya) April 8, 2023
Will the Courts take suo motto cognisance and hold Rahul Gandhi accountable for his party men threatening the judiciary? pic.twitter.com/7SbkNUaIh4
अमित मालवीयंनी साधला निशाणा
भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत काँग्रेस नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर भाजपनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मणिकंदन यांच्या वक्तव्यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. न्यायव्यवस्थेला धमकावणाऱ्या पक्षाच्या लोकांसाठी न्यायालयानं राहुल गांधींना जबाबदार धरलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.