'काँग्रेस-TMC मध्ये जागावाटपावर चर्चा सुरू, लवकरच तोडगा निघेल', राहुल गांधींचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 04:07 PM2024-02-02T16:07:47+5:302024-02-02T16:08:40+5:30
INDIA Alliance Congress-TMC: ममता बॅनर्जी यांच्या स्वबळाच्या घोषणेवर राहुल गांधींची महत्वाची प्रतिक्रिया आली आहे.
INDIA Alliance Congress-TMC: लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. एकीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांच्या INDIA आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी साथ सोडल्यानंतर ममता बॅनर्जीदेखीलइंडिया आघाडी सोडणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांचे महत्वाची प्रतिक्रिया समोर आले आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेसह पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तरुणांशी संवाद साधताना एका तरुणाने त्यांना प्रश्न केला की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष इंडिया आघाडीत आहे. पण, आता त्या आघाडीतून वेगळ्या होताना दिसत आहे. ममतांना एवढे प्राधान्य का दिले जात आहे?
Mr @RahulGandhi :
— Supriya Bhardwaj (@Supriya23bh) February 2, 2024
हमारा #INDIA alliance है ना ममता जी (@MamataOfficial ) ने ना हमने alliance तोड़ा है- Mamtaजी भी कह रहे रही है की वो alliance में है, हम भी कह रहे हैं की हम alliance में है
seat की negotiation चल रही है, resolve हो जाएगा
( ये सुनके सूत्रों का क्या हाल होगा?🧐🤔 pic.twitter.com/C5HtPpaD20
याला उत्तर देताना राहुल म्हणतात, 'आमची इंडिया आघाडी आहे. ममता बॅनर्जी किंवा आम्ही इंडिया आघाडी तोडलेली नाही. ममताजी आघाडीत असल्याचे सांगत आहेत. आम्हीदेखील आघाडीतच आहोत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे, यावर लवकरच तोडगा निघेल.' राहुल यांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेस-तृणमूलमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय स्तरावर त्यांचा पक्ष टीएमसी इंडिया आघाडीचा एक भाग राहील. डावे पक्ष इंडिया आघाडीचा अजेंडा हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता यांनी केला. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, तर पंजाबमध्येही आम आदमी पार्टीने स्वबळाचा नारा दिला आहे. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीची वाट अवघड दिसत आहे.