India-China: ध्यानात ठेवा! हा २०२० मधील भारत आहे १९६२ चा नाही; भारताची चीनला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 07:01 PM2020-06-10T19:01:13+5:302020-06-10T19:04:31+5:30
भारत शांततापूर्ण मार्गाने वादावर तोडगा काढेल, पण आज कोणीही भारताकडे डोळे वटारून पाहू शकत नाही असं विधान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले आहे.
नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर वाढत असलेला तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी चीनला इशारा दिला आहे. चीनने ह लक्षात ठेवावं की, आता २०२० आहे १९६२ नाही. आज भारताचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या धाडसी नेतृत्वाकडे आहे. भारताकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांनो उरी आणि बालकोटमध्ये काही अवस्था झाली ती पाहावी असं त्यांनी सांगितले आहे.
रविशंकर प्रसाद हिमाचल प्रदेशात जनसंवाद वर्चुअल रॅलीला संबोधित करत होते, यावेळी ते म्हणाले की, भारत शांततापूर्ण मार्गाने वादावर तोडगा काढेल, पण आज कोणीही भारताकडे डोळे वटारून पाहू शकत नाही. आज २०२० चा भारत आहे, १९६२ चा नाही, भारताचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात आहे, काँग्रेस नेत्यांच्या हातात नाही असा टोला त्यानी काँग्रेसला लगावला.
भारताला १९६२ च्या लढाईत चीनकडून हार पत्करावी लागली होती. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने लडाखमध्ये सुरु असलेल्या भारत चीन यांच्या सैन्यातील तणावावर भारताला १९६२ च्या युद्धाची आठवण करुन दिली. दोन्ही देशाच्या पातळीवर लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर तणाव कमी करण्यासाठी सैन्यस्तरीय चर्चा सुरु आहे. ६ जून रोजी लेफ्टनंट जनरल पातळीवर चीनची आक्रमकता कमी झाली पण ते जुन्या स्थितीत परतण्याच्या मानसिकतेत नाही.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सरकारला चीन सीमेवर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं त्यावर रविशंकर प्रसाद म्हणाले, राहुल गांधी हीच व्यक्ती आहे जी बालकोट एअर स्ट्राइकचे पुरावे मागत होती. चीनच्या मुद्द्यावर ट्विटरवरुन प्रश्न विचारु नयेत, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर ट्विटरवरुन प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही हे राहुल गांधींना समजायला हवं. राहुल गांधींनी बालकोट एअरस्ट्राइक आणि २०१६ च्या उरी हल्ल्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते असं ते म्हणाले.
Rahul Gandhi should know that on international matters, like China, questions should not be asked on Twitter. He is the same man who asked for evidence after Balakot airstrikes and 2016 Uri attack: Union Minister Ravi Shankar Prasad pic.twitter.com/sxF4VOh9GK
— ANI (@ANI) June 10, 2020
लेफ्टनंट जनरल नितीन कोहली, लेफ्टनंट जनरल आर. एन. सिंह आणि मेजर जनरल एम. श्रीवास्तव यांच्यासह लष्कराच्या 9 माजी अधिकाऱ्यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याला दुर्दैवी म्हणणारे निवेदन जारी केले होते, दरम्यान, राहुल गांधींच्या या विधानावर किरेन रिजिजू यांनी जोरदार पलटवार केला आहे. जेव्हा राजकीय फायदा हा राष्ट्रहितापेक्षा मोठा वाटू लागतो, तसेच कुणी व्यक्ती स्वतःच्या देशाच्या लष्करावर विश्वास ठेवणे बंद करतो, तेव्हा अशाप्रकारची बेजबाबदार वक्तव्ये केली जातात. अपेक्षा करतो की कुणीतरी १९६२ मध्ये केलेल्या चुकांचे आत्मचिंतन करेल अशी बोचरी टीका रिजिजू यांनी केली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
होय, चीननं भारताच्या ‘या’ जमिनीवर कब्जा केलाय; लडाखमधील भाजपा खासदारानं दिली यादी
Video:...अन् मनसे नेत्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर; रुग्णालयातील बिकट परिस्थितीचा भयावह अनुभव
Parle G: स्वदेशी आंदोलनातून मिळाली प्रेरणा; जगात गाजणाऱ्या बिस्किट कंपनीचा ‘असा’ आहे इतिहास!
...म्हणून येत्या १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता राज्य सरकारविरोधात मनसे करणार आंदोलन
‘या’ तारखेपासून राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार; सूत्रांची माहिती