‘इंडिया’ एकजुटीने लढा देईल; भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:30 AM2024-01-26T08:30:09+5:302024-01-26T08:30:18+5:30

पत्रकार परिषदेत गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर देशभरात द्वेष आणि हिंसाचार पसरविल्याचा आरोप केला. 

'India' will fight unitedly; Rahul Gandhi expressed his belief in Bharat Jodo Yatra | ‘इंडिया’ एकजुटीने लढा देईल; भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी व्यक्त केला विश्वास

‘इंडिया’ एकजुटीने लढा देईल; भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी व्यक्त केला विश्वास

कूचबिहार : तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी देशभरातील अन्यायाचा सामना करण्यासाठी विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला. ही आघाडी अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढा देईल, असे ते येथे म्हणाले. 
पत्रकार परिषदेत गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर देशभरात द्वेष आणि हिंसाचार पसरविल्याचा आरोप केला. 

आम्हाला बंगाल आणि भारतात भाजपचा पराभव करायचा असेल, तर ममता बॅनर्जींची नितांत गरज आहे. आम्ही यावर तोडगा काढू. ममतांनी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे. - जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस

Web Title: 'India' will fight unitedly; Rahul Gandhi expressed his belief in Bharat Jodo Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.