"येत्या 6-7 महिन्यांत देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 08:49 AM2020-08-21T08:49:08+5:302020-08-21T08:59:12+5:30
राहुल गांधी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत.
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'येत्या 6-7 महिन्यांत हा देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही' असं म्हटलं आहे. 'देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही. जेव्हा मी देशाला कोरोनामुळे मोठं नुकसान सोसावं लागेल असा इशारा दिला तेव्हा मीडियाने माझी खिल्ली उडवली. आजही मी सांगू इच्छितो की येत्या काळात देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही. तुम्ही याच्याशी संमत नसाल तर केवळ सहा-सात महिन्यांची वाट पाहा' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने एका कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 'देशात दोन प्रकारची अर्थव्यवस्था आहे. एक संघटीत अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये मोठमोठया कंपन्यांचा समावेश आहे. तर दुसरी असंघटीत अर्थव्यवस्था आहे. ज्यामध्ये छोटे, मध्यम वर्गीय नोकरदार, शेतकरी आणि लाखो लोक आहेत. देशात जवळपास 90 टक्के रोजगार असंघटीत अर्थव्यवस्था देशाला देते. आता ही यंत्रणाच नरेंद्र मोदी सरकारनं नष्ट केली, संपुष्टात आणली' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
...India will not be able to provide employment to youth. Media made fun of me when I warned the country that there will be heavy loss due to #COVID19. Today I am saying our country won't be able to give jobs. If you don't agree then wait for 6-7 months: Rahul Gandhi, Congress pic.twitter.com/QlkMhrS5H2
— ANI (@ANI) August 20, 2020
'कंपन्या कोसळतील. छोटे आणि लघु उद्योग संपुष्टात येतील. ते तर आजही होतच आहे. मग देशात काय उरेल. हा देश रोजगार देऊ शकणार नाही. गेल्या काही वर्षांत जे झालं नाही तर आता पाहायला मिळेल, आपला देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही. कारण रोजगार देणारे हे जे लोक आहेत छोटे आणि लघु उद्योग करणारे, शेतकरी रोजगार देऊ शकणार नाही कारण तेच पुरते उद्ध्वस्त झालेत' असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी याआधी "4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात" असल्याचं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "गेल्या 4 महिन्यांत जवळपास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात आहे. फेसबुकवर खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वनाशाचे सत्य देशापासून लपवता येत नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
"द्वेष पसरवून बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वनाशाचे सत्य देशापासून लपवता येत नाही"https://t.co/duiz3ukgeN#RahulGandhi#NarendraModi#unemploymentpic.twitter.com/1PBhoRQIvx
— Lokmat (@MiLOKMAT) August 19, 2020
काही दिवसांपूर्वी राहुल यांनी "नोकरी हिसकावली, जमवलेले पैसेही हडपले, आजाराचा संसर्ग रोखू शकले नाही मात्र ते जनतेला खोटी स्वप्न दाखवत राहिले" असं ट्विट केलं होतं. राहुल गांधी यांनी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन मसुद्यावरून (EIA2020) देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. EIA2020 उद्देशच देशाला लुटण्याचा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं आणखी एक भयंकर उदाहरण असं देखील त्यांनी याआधी म्हटलं होतं.
भाजपाच्या अध्यक्षांनी राहुल गांधींवर केला गंभीर आरोप, म्हणाले...https://t.co/0t8qijWyFr#Congress#BJP#RahulGandhi#NarendraModi
— Lokmat (@MiLOKMAT) August 18, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात"
धक्कादायक! पंतप्रधान मोदींना 18 पानांचं पत्र लिहून मुलीची आत्महत्या
VIDEO: ...अन् बिहारच्या डीजीपींनी थेट रिया चक्रवर्तीची 'औकात' काढली; ऐका काय म्हणाले
बापरे! आग्र्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक, परिसरात खळबळ
"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा