भारताची ताकद वाढणार, PM मोदी अन् ट्रम्प यांच्यातील डीलने शशी थरूर खुश! राहुल गांधींचा मात्र वेगळाच सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 19:55 IST2025-02-14T19:54:06+5:302025-02-14T19:55:42+5:30
"ट्रम्प हे एक उत्तम नेगोशिएटर असल्याचे त्यांच्या संरक्षणमंत्र्याने कालच म्हटले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पेक्षाही मोठे नेगोशिएटर असल्याचे खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत म्हटले आहे. हे छोन होते. हा दौरा छान झाला."

भारताची ताकद वाढणार, PM मोदी अन् ट्रम्प यांच्यातील डीलने शशी थरूर खुश! राहुल गांधींचा मात्र वेगळाच सूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्यांचे कौतुक केले आहे. थरूर म्हणाले, "अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सर्वात मोठे नेगोशिएटर आहेत, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. ट्रम्प हे एक उत्तम नेगोशिएटर असल्याचे त्यांच्या संरक्षणमंत्र्याने कालच म्हटले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पेक्षाही मोठे नेगोशिएटर असल्याचे खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत म्हटले आहे. हे छोन होते. हा दौरा छान झाला. अमेरिकेने भारताला F-35 लढाऊ विमाने विकण्यास सहमती दर्शवली आहे. याचा भारताला अत्यंत फायदा होईल.
थरूर पुढे म्हणाले, "भारताकडे आधीपासूनच राफेलसारखे लढाऊ विमान आहे. आता F-35 च्या आगमनाने देशाची ताकद आणखी वाढेल. अशा प्रकारे आपण मोठे यश मिळवले आहे. पंतप्रधान मोदी भारतात आल्यानंतर यासंदर्भात संपूर्ण माहिती देतीलच."
"डोनाल्ड ट्रम्प स्वतःला एक मोठे बारगेनर मानतात. याचा त्यांना अभिमानही आहे. मात्र, आता ते स्वतःच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्यापेक्षा चांगले नेगोशिएटर म्हणत असतील, तर ही फार मोठी गोष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प हे एक असे व्यक्ती आहेत, जे क्वचितच कुणाची प्रशन्सा करतात. जर त्यांनी भारताच्या पंतप्रधानांचे कौतुक केले असेल, तर ही चांगली गोष्ट आहे, असेही थरूर म्हणाले.
खरेतर, शशी थरूर यांची ही भूमिका पक्षाच्या भूमिकेचा विचार करता पूर्णपणे वेगळी आहे. काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी तर पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला आहे. ते (पंतप्रधान मोदी) परदेशातही गौतम अदानी यांचा बचाव करताना दिसले, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
खरेतर, अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांना गौतम अदानी यांच्या संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले होते, "कोणत्याही व्यक्तीसंदर्भात प्रश्न विचारणे योग्य नाही. हे व्यासपीठ द्विपक्षीय संबंधांचे आहे. येथे दोन्ही देशांशी संबंधित प्रश्न विचारले जायला हवेत. यावरूनच राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.