इलेक्टोरल बॉण्ड्स संदर्भात पकडले म्हणून मुलाखत दिली; राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 07:57 PM2024-04-15T19:57:09+5:302024-04-15T19:57:30+5:30
Pm Narendra Modi Rahul Gandhi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी २०४७ च्या भारताची रूपरेषा सांगितली. माझे लक्ष्य २०२४ नसून २०४७ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Pm Narendra Modi Rahul Gandhi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी २०४७ च्या भारताची रूपरेषा सांगितली. माझे लक्ष्य २०२४ नसून २०४७ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. वेग वाढवावा लागतो आणि स्केलही वाढवावा लागतो. देशासमोर एक संधी आहे. काँग्रेस सरकारचे मॉडेल आणि भाजप सरकारचे मॉडेल पहा, त्यांचे५-६ दशकांचे काम आणि आमचे फक्त १० वर्षांचे काम. कोणत्याही क्षेत्रात तुलना करा,असंही मोदी म्हणाले. या मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर जारदार टीका केली.
"इलेक्टोरल बॉण्ड्समधील महत्वाची गोष्ट नाव आणि तारीख आहे. जर तुम्ही नाव आणि तारीख बघितली तर तुमच्या लक्षात येईल की, ज्यावेळी त्यांनी इलेक्टोरल बॉण्ड दिले आहेत. त्यानंतर लगेच त्यांना एकतर कॉन्ट्रक्ट मिळाले आहे, नाहीतर त्यांची सीबीआय चौकशी सुरू होती ती थांबवली आहे. यात पंतप्रधान पकडले आहेत यामुळेच ते आता एएनआयला मुलाखत देत आहेत. हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे आणि याचे मास्टरमाइंड नरेंद्र मोदी आहेत. या मुलाखतीत तुम्ही त्यांच्या डोळ्यात बघितलं तर दिसेल, असंही राहुल गांधी म्हणाले.
"अचानक सीबीआय चौकशी सुरू होते यानंतर पैसे मिळतात लगेच तिसऱ्या दिवशी सीबीआय चौकशी बंदे होते हे पंतप्रधान यांनी हे समजवले पाहिजे, तसेच हजारो करोडोंचे कॉन्ट्रक्ट कंपपीने पैसे दिल्यानंतर त्यांना मिळते, हे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजावून सांगितले पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणाले. खंडणी गोळा केली आहे खरी गोष्ट हीच आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
व्हिजन 2047 वर काय म्हणाले मोदी? -
पीएम मोदी म्हणाले, माझ्याकडे 25 वर्षांचे व्हिजन आहे. मी गुजरातमध्ये असतानाच यासंदर्भात विचार करत होतो. 2024 च्या निवडणुका ही देशापुढील एक संधी आहे. एक मॉडेल काँग्रेस सरकारचे आणि एक मॉडेल भाजप सरकारचे. त्यांचा 5-6 दशकांचा काळ आणि माझा एक दशकाचा. कोणत्याही क्षेत्रात तुलना करा, तुम्हाला कळेल.