शिंदे कुटुंबाला डिवचून काँग्रेसने मोठी चूक केली, भोपाळमधून ज्योतिरादित्यांचा हुंकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 09:14 PM2020-03-12T21:14:54+5:302020-03-12T21:17:11+5:30
Jyotiraditya Scindia : माझ्यासाठी आजचा दिवस काहीसा भावनिक दिवस आहे. जी संघटना आणि ज्या कुटुंबात मी माझी वीस वर्षे घालवती, माझी मेहनत, संकल्प ज्यांच्यासाठी खर्च केले. त्या सर्वांना सोडून मी आज तुमच्या हवाली होत आहे.
भोपाळ - काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचे आज संध्याकाळी भोपाळमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच काँग्रेसला आव्हान दिले. शिंदे कुटुंबीयांना डिवचून काँग्रेसने मोठी चूक केली आहे, असा इशाराच ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला.
ते म्हणाले की, ‘’जे योग्य आहे ते शिंदे कुटुंबाचा प्रमुख नेहमी बोलत आला आहे. १९६७ मध्ये शिंदे कुटुंबाच्या प्रमुख असलेल्या माझ्या आजीला डिवसले गेले होते. तेव्हा काय झाले हे सर्वांना माहित आहे. पुढे १९९० मध्ये माझ्या वडिलांवर हवाला कांडाचा खोटा आरोप केला गेला. तेव्हा काय झाले? आणि आज मी अतिथी विद्वान आणि शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. जाहीरनाम्यात जे आहे त्याची पूर्तता झाली नाही, तर रस्त्यावर उतरावे लागेल, असे मी म्हटले. शिंदे कुटुंब कायम सत्याच्या मार्गावर चालत आले आहे. शिंदे कुटुंबाला जेव्हा डिवचले जाते तेव्हा हे कुटुंब जगाशी लढण्याची हिंमत बाळगते.’’
Jyotiraditya Scindia at BJP office in Bhopal: Agar pradesh mein do neta hain jo shayad apni car mein AC na chalayein, vo kewal Shivraj Singh aur Jyotiraditya Scindia hain. Meri aasha hai ki aap 1 hain aur hum 1 hain, aur jab 1 aur 1 mil jaye toh 2 nahi 11 hona chahiye. pic.twitter.com/NRn0ATeeBH
— ANI (@ANI) March 12, 2020
माझ्यासाठी आजचा दिवस काहीसा भावनिक दिवस आहे. जी संघटना आणि ज्या कुटुंबात मी माझी वीस वर्षे घालवती, माझी मेहनत, संकल्प ज्यांच्यासाठी खर्च केले. त्या सर्वांना सोडून मी आज तुमच्या हवाली होत आहे. अटल बिहारी वाजपेयी असतील, नरेंद्र मोदी असतील, राजमाता असतील किंवा शिंदे कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी असेन, आमच्यासाठी जनसेवा हाच प्राधान्यक्रम राहिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
Jyotiraditya Scindia at the Bharatiya Janata Party (BJP) office in Bhopal: Today, it is a very emotional day for me. I consider myself fortunate that this family (BJP) opened the doors for me, and that I received the blessings of PM Modi ji, Nadda saheb&Amit bhai.#MadhyaPradeshpic.twitter.com/zmCR308Z5E
— ANI (@ANI) March 12, 2020