शिवसेनेसोबत आघाडी करताना काँग्रेसची कोणती विचारधारा होती?; प्रसाद यांचा सिब्बल यांच्यावर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 22:50 IST2021-06-10T22:49:46+5:302021-06-10T22:50:50+5:30
Jitin Prasad on Kapil Sibbal: सिब्बल यांनी व्यक्तीगत लाभासाठी केलेलं राजकारण म्हणत प्रसाद यांच्यावर केली होती टीका. जितिन प्रसाद यांचा कपिल सिब्बल यांच्यावर पलटवार.

शिवसेनेसोबत आघाडी करताना काँग्रेसची कोणती विचारधारा होती?; प्रसाद यांचा सिब्बल यांच्यावर पलटवार
नुकताच जितिन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, प्रसाद यांनी कपिल सिब्बल यांच्या व्यक्तिगत लाभासाठी केलेली 'प्रसादाचं राजकारण' या टीकेवरही पलटवार केला. "ते (कपिल सिब्बल) हे एक ज्येष्ठ नेते आहेत. कोणतीही विचारधारा आहे. विचारधारा केवळ देशहिताची आहे. जेव्हा काँग्रेस शिवसेनेसोबत आघाडी करत होती तेव्हा कोणती विचारधारा होती. जेव्हा काँग्रेसनं बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत जाण्याचा विचार करत होती तेव्हा कोणती विचारधारा होती. त्याच वेळी ते केरळमध्ये डाव्या पक्षांविरोधात निवडणूक लढत होते," असं म्हणत जितिन प्रसाद यांनी हल्लाबोल केला.
"माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवर टीका करण्यानं काँग्रेसचं नशीब बदलणार नाही," असं प्रसाद यावेळी म्हणाले. त्यांनी एडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. "भारतीय राजकारणात आपण अशा स्थितीवर पोहोचलो आहोत की जिकडे अशाप्रकारचे निर्णय कोणत्याही विचारधारेवर आधारित नसतात. ते यावर आधारित असतात ज्याला मी 'प्रसादाचं राजकारण' म्हणतो," असं सिब्बल म्हणाले होते.
"भाजप अल्पकालिन गोष्टीसाठी लोकांची प्रतीमा मलिन करत नाही. परंतु वास्तविक रुपात तो एक राजकीय पक्ष आहे. त्यांचं लक्ष दीर्धकालिन लक्ष्यांवर असतं," असं प्रसाद म्हणाले. हा निर्णय आपण विचारपूर्वक घेतला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
तीन पीढ्या काँग्रेसची सेवा
"आमच्या तीन पिढ्यांनी काँग्रेसची सेवा केली आहे. परंतु हळूहळू काँग्रेसमध्ये राहणं हे कठीण झालं होतं. मला वाटतं जनता ही नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. मी भाजपमध्ये राहून जनतेची सेवा करू शकतो," असं जितिन प्रसाद म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. आम्ही जनतेमध्ये राहणारे आहोत आणि जनतेला काय हवं हे आम्हा जाणतो, असंही ते म्हणाले.