भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंंदे म्हणाले, हातावर शिक्का मारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 01:08 AM2020-11-02T01:08:26+5:302020-11-02T01:08:59+5:30
jyotiraditya scindia : तीन नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते ज्याेतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवार इमरती देवी यांच्या प्रचारसभेत मतदान करताना ‘हात चिन्हाचे’ बटण दाबा आणि काँग्रेसला... शिंदे यांनी काय चूक केली हे लक्षात येताच व्यासपीठावरील नेते अस्वस्थ झाले व स्वत: शिंदेंनाही चुकीची जाणीव होताच त्यांनी ती दुरुस्त करत कमळाचे बटण दाबा, असे आवाहन केले. तीन नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. शिंदे यांच्या त्या विधानाचा व्हिडिओ सगळीकडे पसरताच काँग्रेसने ट्वीटरवर म्हटले की, शिंदे, मध्यप्रदेशची जनता तुम्हाला खात्री देते की, मंगळवारी मतदानात ते काँग्रेसच्या हात या निवडणूक चिन्हाचे बटण दाबतील.
गेल्या मार्च महिन्यात शिंदे हे २२ आमदारांना घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये आले व त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार कोसळले.मंगळवारी मतदानात ते काँग्रेसच्या हात या निवडणूक चिन्हाचे बटण दाबतील.