ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 01:12 PM2020-05-26T13:12:34+5:302020-05-26T14:04:08+5:30
मध्य प्रदेशात भाजपाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर आणि राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला परतले होते.
नवी दिल्लीः ज्योतिरादित्य शिंदे भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसला जोरदार झटका मिळाला. काँग्रेसचंमध्य प्रदेशातील सरकार कोसळलं अन् तिकडे पुन्हा एकदा भाजपाच्या शिवराज सिंह चौहान यांचं सरकार आलं. ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपाकडून राज्यसभेवरही पाठवण्यात आलं आहे. तसेच लवकरच त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मध्य प्रदेशात भाजपाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर आणि राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला परतले होते.
कोरोनाच्या संकटात ते सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहेत. विशेष म्हणजे ते १ जून रोजी भोपाळला परतणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला शिंदे समर्थक महेंद्रसिंह सिसोदिया यांनी ही माहिती दिली आहे, ते म्हणाले, महाराज भोपाळला येत असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे पुन्हा एकदा भोपाळच्या राजकारणात सक्रिय होणार असल्यानं कॉंग्रेसच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. दोन दिवसांत 200हून अधिक कॉंग्रेस कार्यकर्ते पक्ष सोडून भाजपामध्ये दाखल झाले आहेत. ही केवळ एक सुरुवात आहे, असा दावा माजी मंत्री महेंद्रसिंग सिसोदिया यांनी केला आहे.
पूर्व केंद्रीय मंत्री श्रीमंत @JM_Scindia जी की प्रेरणा से व मेरे नेतृत्व में आज गुना एवं बमौरी के कांग्रेस के कई वरिष्ठ पदाधिकारियों ने प्रदेश के मुख्यमंत्री @ChouhanShivraj , प्रदेश अध्यक्ष श्री @vdsharmabjp के समक्ष @BJP4India की सदस्यता ग्रहण की।@narendramodipic.twitter.com/1YxAd90TSg
— MahendraSSisodia (@Iamsisodia1) May 24, 2020
काँग्रेसचे बरेच मोठे नेते शिंदेंसमोर करतील भाजपामध्ये प्रवेश?
शिंदे यांच्या दौ-याआधी अशी चर्चा आहे की, त्यांच्या आगमनानंतर कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपामध्ये सामील होतील. कॉंग्रेसच्या माजी आमदारांपासून ते अनेक जिल्हाध्यक्ष भाजपामध्ये प्रवेश करू शकतात. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या दौर्यापूर्वी कॉंग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रभाव क्षेत्रातील कॉंग्रेसने पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. कारण तिथले काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी काँग्रेसला भीती आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामुळे हालचाली तीव्र
ज्योतिरादित्य शिंदेंबद्दलची आणखी एक चर्चा अशी आहे की, ते शिवराज कॅबिनेटच्या विस्ताराच्या वेळी उपस्थित असतील. लवकरच शिवराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी राज्यपाल लालजी टंडन यांचीही भेट घेतली आहे. दिल्लीतून नावे शिक्कामोर्तब झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू होईल. शिंदे गोटातील 7 ते 8 लोकांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकेल.
हेही वाचा
CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना
CoronaVirus News: “खोदा पहाड और...."; मोदींच्या पॅकेजमधून घोर निराशा- पृथ्वीराज चव्हाण
Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू
देशातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, योगी अन् नितीश; राहुल, रामदेव पिछाडीवर