नड्डा पुत्राच्या रिसेप्शनमध्ये ज्योतिरादित्यांचा प्रस्ताव आला; अमित शाहांनीच निर्णय घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:34 PM2020-03-11T12:34:59+5:302020-03-11T13:42:16+5:30
काँग्रेसच्या नेतृत्वावर शिंदे नाराज आहेत. ते जर भाजपात आले तर गमावलेले मोठे राज्य पुन्हा भाजपाच्या ताब्यात येईल, असे अमित शाहा यांना सांगण्यात आले.
नवी दिल्ली : भाजपानेअमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्री बनविले आणि त्यांच्या जागी जे पी नड्डा यांना भाजपाचा अध्यक्ष केले. यानंतर देशातील काँग्रेसचा एक मोठा तरुण चेहराच भाजपमध्ये थोड्या वेळात प्रवेश करणार आहे. मध्य प्रदेशमधील या सत्तांतराच्या खेळीचा सारीपाट भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डांच्या मुलाचा लग्नात मांडला गेला. अन् त्यावर नड्डांनी नाही तर अमित शहांनी निर्णय घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात जेपी नड्डा यांचा मुलगा गिरीष याच्या विवाहाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, रेल्वेमंत्री पियुष गोयल आदी भाजपाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी नड्डा व्यस्त असताना चौहान, गोयल यांची अमित शहांसोबत एका कोपऱ्यात सिक्रेट मिटिंग झाली. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात आणण्याची चर्चा झाली.
काँग्रेसच्या नेतृत्वावर शिंदे नाराज आहेत. ते जर भाजपात आले तर गमावलेले मोठे राज्य पुन्हा भाजपाच्या ताब्यात येईल, असे अमित शहा यांना सांगण्यात आले. यानंतर शिंदे यांच्या मागे किती आमदार आहेत यावरही चर्चा झाली. हा आकडा दाखविण्यासाठीच शिंदे समर्थक असलेल्या 19 आमदारांना थेट बेंगळुरूला हलविण्यात आले. कमलनाथ सरकार अल्पमतात आल्याची खात्री पटल्यानंतर रिसेप्शनच्या तीन दिवसांनी मंगळवारी ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजप प्रवेशाला अमित शहा यांनीच हिरवा कंदील दाखविला. यानंतर कुठेही नड्डा प्रकाशात आले नाहीत. मंगळवारी अमित शहांनीच शिंदेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट घडवून आणली.
ज्योतिरादित्य शिंदेंना गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींना भेटायचे होते, पण...
ज्योतिरादित्य शिंदे आजच भाजपात प्रवेश करणार; दिल्लीत जय्यत तयारी
'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले
राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप
...म्हणून आजचा दिवस ज्योतिरादित्य सिंधियांसाठी खास; लवकरच धरणार भाजपचा 'हात'
आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार