ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर भावाची हरकत; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:00 AM2020-03-13T11:00:52+5:302020-03-13T11:03:01+5:30

काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर राहुल यांनी म्हटले होते की, ज्योतिरादित्य यांना आपल्याला भेटण्यासाठी वेळ घेण्याची कधीही आवश्यकता नव्हती. यावर देव वर्मन म्हणाले की, राहुल यांनी आपल्या कार्यालयाला या संदर्भात विचारायला हवं. 

Jyotiraditya's brother objected to BJP's entry; Said ... | ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर भावाची हरकत; म्हणाले...

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर भावाची हरकत; म्हणाले...

Next

नवी दिल्ली - त्रिपुरा काँग्रेसचे माजी प्रमुख आणि माणिक्य शाही कुटुंबातील सदस्य प्रद्योत देव वर्मन यांनी आपले चुलत बंधू ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. भाजपमध्ये प्रवेश करणे योग्य पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना संधी देण्यात येत असल्याचा दावा देववर्मन यांनी केला. गेल्या वर्षीच देववर्मन यांनी त्रिपुरा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

भाजपसोबत जाण्याचा पर्याय योग्य नाही. आपण सर्वांनी एकत्र यायल हवं. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस नेतृत्व देखील युवा नेत्यांना समोर आणण्यास तयार आहे. देशासाठी आपण कसं योगदान देऊ शकतो, याचा विचार होणे गरजेचे आहे. देशाला प्रभावी विरोधकांची आवश्यकता आहे. त्यामुळे युवा नेत्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं, असंही देव वर्मन यांनी सांगितले.

राजस्थानचे सचिन पायलट आणि झारखंडचे अजय कुमार यांच्यासह अनेक नेत्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे.  भाजपविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेस तयार नसेल तर नवीन पक्ष स्थापन करून त्यात सर्वांना घेऊन काम करायला हवे, असंही देववर्मन यांनी सुचवले. गेल्या वर्षी माजी आयपीएस अधिकारी आणि झारखंड काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार यांनी काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. 

राहुल गांधी यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर राहुल यांनी म्हटले होते की, ज्योतिरादित्य यांना आपल्याला भेटण्यासाठी वेळ घेण्याची कधीही आवश्यकता नव्हती. यावर देव वर्मन म्हणाले की, राहुल यांनी आपल्या कार्यालयाला या संदर्भात विचारायला हवं. 

Web Title: Jyotiraditya's brother objected to BJP's entry; Said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.