Madhya Pradesh Crisis: कमलनाथांनी सोपविला राज्यपालांकडे राजीनामा; सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 01:42 PM2020-03-20T13:42:42+5:302020-03-20T13:44:55+5:30

Madhya Pradesh political Crisis: काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल, असा आरोप कमलनाथ यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला.

Kamal Nath submitted his resignation to Madhya Pradesh Governor Lalji Tandon hrb | Madhya Pradesh Crisis: कमलनाथांनी सोपविला राज्यपालांकडे राजीनामा; सांगितले कारण

Madhya Pradesh Crisis: कमलनाथांनी सोपविला राज्यपालांकडे राजीनामा; सांगितले कारण

Next

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये रंगलेले सत्तेचे नाटक आज १७ दिवसांनी संपले आहे. फ्लोअर टेस्टच्या आधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा राज्यापालांकडे सोपविला असून भाजपावर सरकार अस्थिर करण्याचा आरोप केला आहे. भाजपाने लक्षात ठेवावे उद्या आणि परवाचा दिवसही उजाडणार आहे, लोकांच्या समोर सत्य येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कमलनाथ यांनी सांगितले की, भाजपाने २२ आमदारांना अपहृत केले होते, हे देशच बोलत आहे. करोडो रुपये खर्च करून हा खेळ खेळला गेला. एक महाराज आणि त्यांच्या २२ सहकाऱ्यांनी मिळून कट रचला. काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल असा आरोप त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला.

आम्ही एकदा नाही तर तीनवेळा विधानसभेत बहुमत दाखविले होते. भाजपाने जनतेचा विश्वासघात केलाच आहे पण लोकशाहीच्या मुल्यांची हत्याही केली आहे. त्यांना जनता कधी माफ करणार नाही. भाजपा पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांनी भाजपावर केला आहे.

गेल्या १५ महिन्यांमध्ये सरकारने गोमातेच्या संरक्षणासाठी गोशाळा बनविण्यात आल्या. नेमके हेच काम भाजपाला आवडले नाही. मध्य प्रदेशला भयमुक्त केल्याचेही भाजपाला आवडले नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला, यामुळे भाजपाने सरकार पाडण्याचे प्रयत्न केले, असे आरोप त्यांनी सरकार पडण्यामागे भाजपावर केले आहेत.

गेल्या १५ महिन्यांत सरकारने पहिल्या टप्प्यात ३ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात ७ लाख शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. तर तिसऱ्या टप्प्यात आणखी २ लाख शेतकऱ्यांन कर्जमाफी दिली. भाजपाने या शेतकऱ्यांना धोका दिला आहे, असा आरोपही कमलनाथांनी केला.

Web Title: Kamal Nath submitted his resignation to Madhya Pradesh Governor Lalji Tandon hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.