पंतप्रधान पदासाठी काँग्रेसला मल्लिकार्जुन यांचं नाव नाही पटलं? आता या बड्या नेत्याचं नाव पुढे केलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 04:05 PM2023-12-29T16:05:21+5:302023-12-29T16:08:00+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या I.N.D.I.A.च्या बैठकीत लोकसभा निवडणूक 2024 साठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या I.N.D.I.A.च्या बैठकीत लोकसभा निवडणूक 2024 साठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी ठेवला होता.
तेव्हा जवळपास सर्वांनीच यावर सहमती दर्शवली होती. तसेच, काँग्रेससाठी हे गुगली प्रमाणे आहे, अशी चर्चाही सुरू होती. मात्र यातच, आता काँग्रेसमधून एक वेगळा सूरही ऐकू येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
सिद्धारामय्या म्हणाले, "देशाचे प्रश्न सोडवण्याची क्षमता केवळ काँग्रेस पक्षात आहे. यामुळे राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे. काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी बेंगळुरूमध्ये सिद्धरामय्या यांनी हे नाव सुचवले आहे. त्यांचे हे विधान I.N.D.I.A. च्या बैठकीत मांडल्या गेलेल्या प्रस्तावाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. त्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी खर्गे यांचे नाव पुढे केले होते. तेव्हा, खुद्द खर्गे यांनी बैठकीनंतर पंतप्रधान पदाच्या उमेदवारासंदर्भात नंतर चर्चा करता येईल. त्या पूर्वी आपल्याला जास्तीत जास्त खासदार जिंकूण आणावे लागतील.
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले, देशात राहुल गांधी यांच्यासारखी मेहनत कुणीही केलेली नाही. त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्यांनी आता भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही न्याय यात्रा असेल. कारण देशातील अधिकांश लोकांना न्याय मिळत नाहीये. देशातील मागास लोक, दलित, अल्पसंख्याक आणि महिला यांना न्याय देण्याची गरज आहे. यामुळे राहुल गांधी प्रवासाला निघाले आहेत. एवढेच नाही, तर विरोधी पक्षांनी सर्व मतभेद विसरून 2024 च्या निवडणुका काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढयला हव्यात, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.