Karnataka Assembly Election: कर्नाटकात कोणते मुद्दे कोणावर भारी? भाजपा आणि काँग्रेससाठी हे मुद्दे ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 09:09 AM2023-04-20T09:09:57+5:302023-04-20T09:10:37+5:30

Karnataka Assembly Election 2023:

Karnataka Assembly Election: Which issues are heavy on whom in Karnataka? These issues will be decisive for BJP and Congress | Karnataka Assembly Election: कर्नाटकात कोणते मुद्दे कोणावर भारी? भाजपा आणि काँग्रेससाठी हे मुद्दे ठरणार निर्णायक

Karnataka Assembly Election: कर्नाटकात कोणते मुद्दे कोणावर भारी? भाजपा आणि काँग्रेससाठी हे मुद्दे ठरणार निर्णायक

googlenewsNext

- सुनील चावके  
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गौतम अदानींच्या कंपन्यांमधील कथित भ्रष्टाचार, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा स्फोटावरून केलेले गौप्यस्फोट, अरविंद केजरीवाल यांची झालेली चौकशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा वाद, राहुल गांधींकडून मोदींना लक्ष्य करण्याचे प्रयत्न यासारखे मुद्दे निष्फळ ठरून स्थानिक मुद्देच निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

सी व्होटरचे संचालक यशवंत देशमुख यांच्या मते कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर आहे आणि त्यात बदल होण्याची सध्या तरी काही शक्यता नाही. ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर लढली जाऊन मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी व्हावी, असा भाजप कसोशीने प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी न होता स्थानिक मुद्द्यांवरच लढली जावी, असा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे. पण निवडणूक मोदी विरुद्ध राहुल व्हावी, असे राहुल गांधी व त्यांच्या समर्थकांना वाटते. 

यावरही गोष्टी अवलंबून
निवडणुकांमध्ये राष्ट्रीय नव्हे तर स्थानिक मुद्देच प्रभावी ठरतात. भाजपचा विजय किंवा पराभव स्थानिक मुद्द्यांवरच निश्चित होणार आहे. अशा स्थितीत राहुल गांधींनी प्रचारात राष्ट्रीय मुद्दे आणल्यास काँग्रेसचे नुकसान होईल, असे देशमुख म्हणाले. 

जनतेला राज्यात हवा आहे बदल
कर्नाटकात राज्य सरकार, भाजपचे केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांविरोधात रोष व्यक्त करणाऱ्या जनतेला राज्यात बदल हवा आहे.

२२४ जागांचा पहिला 
ओपिनियन पोल 
काँग्रेस    ११५ ते १२७ 
भाजपला    ६८ ते ८० 
जनता दल से.    २३ ते ३५ 
इतर व अपक्ष    २ 
(सी व्होटरच्या दुसऱ्या ओपिनियन पोलचे निष्कर्ष २९ एप्रिल रोजी जाहीर होणार आहेत.)

काँग्रेसची विचित्र स्थिती
राहुल गांधी यांचे प्रचाराचे मुद्दे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांच्या मुद्द्यांशी जुळणारे नाहीत. केंद्रीय नेत्यांचा प्रचार निष्फळ ठरणार याची त्यांना जाणीव आहे. काँग्रेससाठी ही विचित्र स्थिती आहे. 
हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत राहुल गांधींचा सर्वात मोठा वाटा त्यांनी त्या राज्यात प्रचारासाठी न फिरकणे हाच होता. त्यामुळेच काँग्रेस सत्तेत येऊ शकली, अशी कोपरखळी देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना लगावली. 

मुख्यमंत्री बोम्मई यांचा उमेदवारी अर्ज दाखल 
nकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी आपला परंपरागत विधानसभा मतदारसंघ शिग्गाव येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे अध्यक्ष नड्डा उपस्थित होते. 
nउमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी  रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. शिग्गावमध्ये काँग्रेसने मोहम्मद युसूफ सावनूर यांना उमेदवारी दिली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांनी शिवमोग्गा जिल्ह्यातील शिकारीपुरा विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

‘राजकारणातून संन्यास घेणार’
nबंगळुरू : कर्नाटकच्या १० मे रोजी विधानसभा निवडणुका झाल्या की मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करत आहे, असे त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. म्हैसूर येथील वरुणा मतदारसंघात एका जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. 
nसिद्धरामय्या यांनी या सभेत सांगितले की,निवडणुकांमध्ये जनतेने काँग्रेसला विजयी करावे. भाजप सरकारच्या कार्यकाळात कर्नाटक प्रगती घटली आहे. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे.

आपचे कर्नाटकमध्ये ‘आस्ते चलो’
गेल्या काही महिन्यांपासून आपच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशींचा ससेमिरा लागलेला असल्याने कर्नाटकमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आप नेते फारसे उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतरही आप पहिल्यांदा कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवित आहे. 

कर्नाटकमधील आयाराम गयाराम

भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केेलेले नेते 

- शेट्टर - माजी मुख्यमंत्री
- सवदी - माजी उपमुख्यमंत्री 
- चिंचनसूर - विधान परिषद सदस्य
- पुटण्णा - विधान परिषद सदस्य
- गोपालकृष्ण - आमदार
- मनोहर ऐनापूर - माजी आमदार
-नंजुंदस्वामी - माजी आमदार
जनता दल (सेक्युलर)मधून काँग्रेसमध्ये प्रवेश
- शिवलिंगे गौडा - आमदार
nएस. आर. श्रीनिवास - आमदार
भाजपतून जनता दल (सेक्युलर)मध्ये शिरकाव
- आयानूर मंजूनाथ -
विधान परिषद सदस्य
- चंद्रशेखर
जनता दल (सेक्युलर)मधून भाजपमध्ये प्रवेश
- ए. टी. रामस्वामी - आमदार
भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
- आर. शंकर - 
विधान परिषद आमदार
काँग्रेस ते भाजपपर्यंतचा प्रवास
nबी. व्ही. नायक - माजी खासदार
काँग्रेसमधून जनता दल (सेक्युलर)मध्ये प्रवेश
nप्रसन्नकुमार
विधान परिषदेचे माजी सदस्य

कोणाला किती पसंती? 
६२%      नरेंद्र मोदी
२७% राहुल गांधी
(राज्यात मिळत असलेली पसंती)

Web Title: Karnataka Assembly Election: Which issues are heavy on whom in Karnataka? These issues will be decisive for BJP and Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.