...तर 2019 मध्ये नक्की पंतप्रधान होईन- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 11:38 AM2018-05-08T11:38:08+5:302018-05-08T12:02:44+5:30
राहुल गांधी यांचं पहिल्यांदाच पंतप्रधान पदाबद्दल भाष्य
बंगळुरू: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास नक्की पंतप्रधान होईन, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलंय. 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास पंतप्रधान होणार का, असा प्रश्न कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देत राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान पदाबद्दल भाष्य केलं.
Yes why not: Congress President Rahul Gandhi on being asked if he can be PM in 2019 if Congress is the single largest party. #Bengaluru#KarnatakaElections2018
— ANI (@ANI) May 8, 2018
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकात असलेल्या राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. 'मोदी आणि भाजपाला मुख्यमंत्रीपदासाठी निष्कलंक चेहरा मिळाला नाही का?', असा प्रश्न उपस्थित करत राहुल यांनी येडियुरप्पांवर निशाणा साधला. याशिवाय रेड्डी बंधू यांनी दिलेल्या उमेदवारीहून राहुल गांधी भाजपा नेतृत्वार बरसले. 'तब्बल 35 हजार कोटी रुपयांची लूट करणाऱ्या रेड्डी बंधूंना भाजपानं उमेदवारी का दिली?', असा सवाल करत राहुल गांधी यांनी भाजपाच्या भ्रष्टाचारविरोधी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
We are repeatedly asking the Prime Minister why has he chosen a corrupt person, who has been in jail as his party's CM candidate?: Rahul Gandhi in Bengaluru #KarnatakaElections2018pic.twitter.com/FJwvfW8U2m
— ANI (@ANI) May 8, 2018
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही राहुल गांधी शरसंधान साधलं. अमित शाह यांच्यावर खुनाचा आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणतीही विश्वासार्हता नाही, असं राहुल म्हणाले. 'भाजपा अध्यक्षावर खुनाचा आरोप आहे, हे देशातील जनतेच्या लक्षात नाही. जो पक्ष प्रामाणिकपणा, नैतिकतेच्या गोष्टी करतो, त्या पक्षाच्या अध्यक्षावर खुनाचा आरोप आहे,' असं राहुल गांधींनी म्हटलं. मोदी सरकारनं तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र रोजगार निर्मितीच्या आकड्यानं गेल्या 8 वर्षांमधील नीचांक गाठला आहे, असं राहुल गांधी म्हणाले.