Karnataka Election 2018: एका क्लिकवर जाणून घ्या ठळक मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 09:47 AM2018-05-12T09:47:46+5:302018-05-12T09:47:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजूनही कायम आहे, की काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रभाव वाढतोय, हे या निवडणुकीतून ठरणार आहे.
बेंगळुरूः काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान सुरू झालं आहे. स्वाभाविकच, या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलंय. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजूनही कायम आहे, की काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रभाव वाढतोय, हे या निवडणुकीतून ठरणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत या दोघांमध्ये आणि त्यांच्या-त्यांच्या पक्षाच्या रथी-महारथींमध्ये जबरदस्त शाब्दिक चकमक रंगली होती. मतदारराजानं दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलंय आणि आज तो आपला कौल देण्यास सज्ज झालाय. त्यानिमित्तानं, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील ठळक मुद्द्यांवर एक दृष्टिक्षेप...
* एकूण जागाः २२४
* बहुमताचा आकडाः ११३
* किती जागांवर होतंय मतदान? - २२२
(जयनगर इथल्या भाजपा उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं आणि राजराजेश्वरी येथे बनावट ओळखपत्र सापडल्यानं निवडणूक स्थगित)
* भाजपा किती जागा लढवतेय? - २२२
* काँग्रेस किती जागा लढवतोय? - २२०
* जनता दल (ध) + बसपा - २१७
* एकूण उमेदवारः २,६००
* एकूण मतदारः ४.९६ कोटी
* कर्नाटकात २ कोटी ५२ लाख पुरुष, २ कोटी ४४ लाख महिला तर ४ हजार ५५२ तृतीयपंथी मतदार
* मतदान केंद्रः ५५,६००
* प्रत्येक मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट असल्याने मत कुणाला गेलं हे मतदारांना कळणार
* मतमोजणीः १५ मे २०१८
.........
>> १९८५ पासून सलग दोन टर्म सत्ता कुठल्याच राजकीय पक्षाला मिळालेली नाही.
>> मुख्यमंत्री सिद्धरामय्या दोन जागांवरून लढताहेत निवडणूक
>> दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पहिलेच मुख्यमंत्री
>> माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
>> माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जद(ध) 'किंगमेकर' ठरण्याचा ओपिनियन पोलचा अंदाज
>> गेल्या तीन निवडणुकांमधील संख्याबळ
>> काय सांगताहेत ओपिनियन पोल