राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 02:25 PM2023-05-13T14:25:49+5:302023-05-13T14:26:59+5:30

राहुल गांधी यांनी 51 विधानसभा मतदारसंघांमध्ये केली होती यात्रा...

karnataka election Rahul Gandhi did Bharat Jodo Yatra in Karnataka, how is the condition of Congress on those places | राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या

राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या

googlenewsNext

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या या यशाबद्दल राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचीही (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) जबरदस्त चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांनी ज्याज्या मतदार संघांमधून भारत जोडो यात्रा केली त्या सर्व जागांवर काँग्रेसने चांगली कामगिरी केल्याचे चित्र आहे.

राहुल गांधी यांनी 51 विधानसभा मतदारसंघांमध्ये केली होती यात्रा -
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) माध्यमातून कर्नाटकातील 224 विधानसभा मतदार संघांपैकी 51 मतदारसंघ कव्हर केले होते आणि यांपैकी 32 जागांवर काँग्रेसने आघाडी मिळवली आहे. अशा प्रकारे काँग्रेसला 63 टक्के जागांवर राहुल गांधी यांच्या यात्रेचा फायदा झाला आहे. तसेच, सुरुवातीच्या निकालात राहुल गांधी यांनी रात्रा केलेल्या 19 जागांवर काँग्रेस पक्ष पिछाडीवरही दिसत होता.

राहुल गांधी यांनी कर्नाटकात 21 दिवस केली होती भारत जोडो यात्रा -
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी पासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती आणि 3 महिन्यातं जवळपास, 4000 किलोमीटर एवझी यात्रा करून ते काश्मीरात पोहोचले होते. यांपैकी 21 दिवस, म्हणजेच 30 एप्रिल ते 19 ऑक्टोबरपर्यंत राहुल गांधी यांनी कर्नाटकात यात्रा केली. यादरम्यान ते रोज जवळपास 25 किलोमिटर पर्यंत यात्रा करत होते. 

Web Title: karnataka election Rahul Gandhi did Bharat Jodo Yatra in Karnataka, how is the condition of Congress on those places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.